Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८६
पाचर.

लहान पाचरेपासून थोडकें फळ होते, परंतु तिला थोडा प्रतिबंध प्राप्त होतो; आणि १३२ व्या आकृ- तींतील मोठ्या पाचरेपासून मोठें फळ होईल, परंतु तिला प्रतिबंधही मोठा प्राप्त होईल. पाचरेचे यांत्रिक सामर्थ्याची गणना करितांना ही पुढील रीति कामांत आणितात. पाचरेचा डोक्याची रुंदी जशी पाचरेचा एका बाजूस प्रमाण, तशी शक्ति पाचरचा एका बाजूचा प्रतिबंधास प्रमाण होईल; पाचर आणि तिला जो प्रतिबंध होतो, या दोहों मधील प्रमाणाची गणना बरोबर करण्यास फार कठीण; कारण शक्ति ह्मणजे जे टोले मारितात ते, त्यांची संख्या आणि प्रतिबंधाचा जातीचे भेद हीं सर्व गणना कर ण्याची साधनें आहेत; उदाहरण, नरम देवदारी लांकडापेक्षां चिंबट खैराचें अथवा बाभळीचे लांकूड चिरण्यास अधिक शक्ति लागते. मोठ्या उतराचा उतरणीवरून जड पदार्थ वर लोटण्यास जसा फार श्रम पडतो, त्याचप्रमाणे मोठ्या कोनाचा पाचरेसपुढे लोटायास फारशक्ति लागये. जरी पाचरेचा कोनाचें माप दिले असले आणि प्रत्येक टोल्याचा सामर्थ्याची गणना करितां आली, तरी सामान्य पक्षीं पाचरेचा यांत्रिक शक्तीची गणना करण्यास कठीण. लांकूड, दगड इत्यादि पदार्थ चिरतांना त्यांचे चिरलेले भाग उच्चालका सारिखे होऊन, पाचरेचा जाण्यास मार्ग करितात, तेणेकरून पाचरेची शक्ति अवश्य वाढले. पाचरेचा शास्त्रार्थास गणितरूप विचार फार लागतो,