Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५२
आंसास खिळलेल्या चाकाचा अनेक योजना.

चालवितां येते, हा या यंत्रांत एक मोठा गुण आहे, याशिवाय चाकें दुसन्या यंत्रांस अनेक तन्हांनी सहज जोडितां येतात. यावरून जा मिश्र यंत्रांत चार्के मुख्य अवयव नाहींत अशीं मिश्र यंत्रें फार थोडीं; बुंदा दळण्याचें यंत्र, लोखंडाचे पत्रे दाबण्याची आणि त्यांस कापून त्यांचे बार करण्याची यंत्रे, चाकांचा गाड्या, कांतण्याचे सांगाडे, आणि दळण्याची यंत्रे, घडीयाळे आणि सर्व काळमापक यंत्रे; सूत कातण्याचे यंत्र आ णि कापूस, लोकर, रेशीम यांची वस्त्रे करण्याची यंत्रे आणि निरनिराळ्या कामाकरितां निरनिराळ्या प्रका रची वाफ यंत्रे, इत्यादि अनेक प्रकारची यंत्रे यावरून केली आहेत. -


________