Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
क्रेन यंत्र. वेदमिल्

१५१

उभा राहतो, आणि याप्रमाणे सर्वकाळ घडतें.

 बंदरे आणि वखारी इत्यादि स्थळीं मोठमोठी वजने वर उचलण्याकरितां आणि खाली सोडण्याकरितां, जें क्रेन या नावाचे यंत्र असतें, तें व्यवहारांत आंसास खि- ळलेल्या चाकाचा योजनेचे एक उदाहरण दृष्टीस पडतें. मोठ्या चाकाचा आंत मनुष्यांस चालवून हैं यंत्र चालू करण्याची पूर्वी चाल होती; परंतु यापासून नफा न होतां केवळ अपाय मात्र होतात, यामुळे ही चाल सोडून दिली आहे. आंसास खिळलेल्या चा- काचा परिघास, उदकप्रेरित चक्राप्रमाणें फळीं बसवा - वीं, आणि त्यांवर एक अथवा अनेक मनुष्यांकडून भार घालवावा; भार घालण्याचें ठिकाण चाकाचा आडव्या आंसाचा उंची इतके उंच असावें, अशा तन्हेनें या यंत्रावर मनुष्याचा शक्तीची योजना चांगल्या रि- तीने घडत्ये, व त्यापासून नफाही होतो. बंदिवान लोकांपासून काम घेण्याकरितां अशा योजनेचीं यंत्रे बहुतकरून सर्व फौजदारी तुरुंगांत आहेत, त्यांस त्रेद- मिल असें ह्मणतात. पाणी काढण्याचा पायराहाट याच योजनेचें उदाहरण आहे.

 गति वाढविण्याकरितां आंसास खिळलेल्या चाका- चा उपयोग करितात. यास उदाहरण सूत कांता - याचा राहाट -

 सर्व यंत्रांमध्यें आंसास खिळलेले चाक हें फार मूळ उपयोगी यंत्र आहे, यामुळे ते मित्र यंत्राचा अवयवांत असतें ; या यंत्राची गति वाटोळी असून ती अखंड