Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अध्याय ९.
दोरी अथवा कप्पी.

मागील भागांत जा यंत्रांचा विचार झाला तीं ताठ पदार्थाचीं केलीं आहेत असें मानिलें; परंतु जा यंत्राविषयीं आतां विचार करणें आहे, त्याचें यांत्रिक सामर्थ्य त्याचा प्रकृतीचा ताठपणावर असतें.एका दिशेपासून दुसऱ्या दिशेस प्रेरणा लागू करण्यासाठी दोरी हे यंत्र घेतां येतें, हा या यंत्रापासून मोठा लाभ होतो. मनांत आण की अ दिशेत प्रेरणा लागू करून कवजन उचलून धरावयाचें आहे; ( आकृति १०३) दोरीचें एक टोंक वजनास बांधून दुसरें टोंक अ बाजू-. वरून टांगून त्यास शक्ति लागू केली असतां, वरची प्रतिज्ञा सिद्धीस जाईल. जा आधारावरून अथवा टोंका- वर दोरी जाते तें जर लां- कडाचें अथवा लोखंडाचें आकृति १०३. असले, तर प्रेरणेचा व्यापारामुळे पुष्कळ घर्षण हो- ऊन दोरी लवकर झिजून जाईल; या अडचणीचें नि-