Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मिश्रचक्ररूप यंत्र.

१४१

पडेल अशा तऱ्हेने या आसाचें चाक मोठें अ- आकृति ९५. सतें, आणि त्याचा घे न्यास बाजूवरील आकृ- तीप्रमाणें दांत्ये अस- त, (आ० ९५ ) हैं चा- क दुसऱ्या एका लहान चाकावर लागू असतें, त्यास संयोगी चक्र - व णतात; हैं चक्र दुसऱ्या एका आंसास खिळलेलें असतें, आणि त्यास अशा तन्हेनें बसवितात कीं तें चाक व हें संयोगी चक्र हीं दोनही फिरूं लागलीं असतां परस्प- रांचे दांत्ये एकमेकास लागू व्हावे. या दुसऱ्या आं- साचा शेवटास एक मोठे चाक बसविलेलें असतें, आ- णि त्याचा धारेसही दांत्ये असतात; आणि या चाकाखा लीं दुसरें एक संयोगी चक्र आंसास खिळवून बसवितात. या संयोगी चक्राचा आंसाचा दुसऱ्या बाजूस एक चाक असतें, त्यास सर्व यंत्र चालविणारी शक्ति लावितात. ह्रीं सर्व चा बाजूवरील आकृतीत दाखविली आहेत. मोठी चाके आणि लहान संयोगी चक्रे यांचा या सं- योगांत, सततवर्ती असा एक लांब उच्चालक, एका सततवर्ती लहान उच्चालकावर लागू होतो असें असतें ; तेणेंकरून पुष्कळ यांत्रिक हित होतें. नुसत्या पहिल्या चाकाची त्रिज्या वाढविली असतां जो स्वार्थ झाला अ सता, तोच स्वार्थ या सर्व संयोगापासून होतो, आणि