Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४०
व्यवहारी दृष्टांत.

तसे एका मनुष्याचे शक्तीस, त्याणें उचलिलेले वजन होईल, यावरून जसें १ स १२, तसे २०० शेर एका मनुष्यानें उचलिलेल्या वजनास होतील, ह्मणजे २४००- शेरांस. सर्व वजन उचलायासाठीं १० यंत्रे होती आणि प्रत्येकास दहा मनुष्ये होतीं, ह्मणून वर आलेल्या एक मनुष्याचा अंशास ह्मणजे २४०० शेरांस १०० नीं गुणिलें असतां गुणाकार २४०००० शेर होतो, तो उचलावयाचा वजनापेक्षां अतिशय मोठा आहे. रोम शहरांतील सैंत पीतर देवळाचा समोरचा भागांतील मोठी दिपमाळ, इतली देशचा कारागिर डोमिनिको फोनताना याणें वरचासारिखीं पुष्कळ यंत्र एकत्र मि ळवून, त्यांचा योगानें ती तेथून सारिली, तिचें वजन सुमारे दहा लक्ष पौंड आहे.

 आंसास खिळलेल्या चाकास लावलेल्या शक्तीपेक्षां जर वजन अतिशय मोठे असेल, तर कदाचित् त्याचा आंस मोडेल, अथवा तें उचलण्यासाठीं चाक मोठे अवजड करावें लागेल असें वर सांगितलें ; यावरून जेव्हां मोठ्या शक्तीची गरज असत्ये, तेव्हां मिश्र उ- च्चालकाप्रमाणें, आंसास खिळलेल्या चाकांचे संयोग करितां येतात, आणि दोहों पक्षीं तुलनेचे नियम एक सारिखेच असतात.

 मिश्र चक्ररूप यंत्रांत पहिल्या चाकाचा परिघास शक्ति लाविलेली असत्ये, तिचें फळ चाकाचा योगानें पहिल्या आंसाचा परिघावर जातें. हा आंस वजनाचा भार सोशी- ल असा जाड आणि बळकट केला असतो, आणि सोईस