Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४२
मिश्रचक्ररूप यंत्र.

पुनः तो सुलभपणानें आणि अडचणीवांचून घडतो. अशा जातीचा यंत्रांत जितकी चाके अस तात त्यांजवर लागू होणाऱ्या सर्व शक्तींचा गुणाकार केल्यानें आंसास खिळलेल्या चाकाचा शक्तीची गणना करितां येत्ये. निरनिराळ्या चाकांचे परिघ अथवा व्यास आणि त्यांचे त्यांचे आंसांचे परिघ अथवा व्यास यांतील जे प्रमाणांक असतात, त्यांवरून शक्तीची गण- ना होये. उदाहरण, ४० शरांचा शक्तीनें ४३२० शेरांचें वजन उचलावयाचें आहे असे मनांत आण, तर यापक्षी त्यांचे प्रमाण १०८ यांस १ असें हाईल. पुनः मनांत आण कीं आंसाचा व्यास ८ इंच आहे, आणि तो आंस मोडल्यावांचून वजनास उचलून घरी असा आहे. आतां जर केवळ साध्या यंत्राचा उपयोग केला, तर हें वजन उचलून धरण्यासाठी ८ इंच व्यासाचा आंसास, ७२ फुटी झणजे ८६४ इंच व्यासाचें चाक पाहिजे हे उघड आहे. कारण १०८ वजनास जर आंसाचा व्यास, ह्मणजे ८ इंच, यांणीं गुणिलें, तर गु- णाकार ८६४ येतो; ह्मणून यांस तोलून धरण्यासाठी चाकाचा व्यास ८६४ इंच असला पाहिजे, ह्मणजे ८६४ × १ (शक्ति) = ८६४. परंतु इतक्या मोठ्या चाकाचें यंत्र अवजड आणि चालविण्यास कठीण या मुळे चाकांचे संयोग कामांत आणले पाहिजेत.

 जर शक्ति १ असून तिचा वेग २० असेल, आणि वजन २० असून त्याचा वेग १ असेल, तर शक्ति आ णि वजन हीं परस्परांस तोलून धरितील असे मागें दा-