Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
व्यवहारी दृष्टांत.

१३९

जसे फिरतात त्याप्रमाणें उभा असही त्यांचाबरोबर फिरतो, आणि तेणेकरून दोर आसाभोवता गुंडाळून वजन जवळ येतें.

 या यंत्राचा उपयोग गलबताचे नांगर उचलण्यांत मुख्यत्वेकरून करितात. काम करावयाचे नसते तेव्हां दांडे काढून एकीकडे ठेवितात.

 या यंत्राचे सामर्थ्याची गणना करित्येसमयीं, आं- सास खिळलेल्या चाकासारिखीं प्रमाणें घेतली पाहिजेत; जसे, चाकाचा त्रिज्येस (ह्मणजे या पक्षीं आंसाची अर्ध जाडी आणि दांड्याची लांबी मिळून चाकाची त्रिज्या होत्ये) जशी आंसाची त्रिज्या, तसा एका दांड्याचा टोंकास एक मनुष्य आपली शक्ति लावून सर्व वजना- चा जो अंश उचलतो, त्यास त्या मनुष्याची शक्ति प्रमाण होईल.

 मनांत आण कीं, २०,००० शेरांचे वजनाचा द- गड उचलावयाचा आहे, आणि अशा जातीचीं दहा यंत्रे त्या दगडाभोंवतीं ठेविलीं आहेत, आणि प्रत्येक यंत्रास दहा दांडे आहेत, त्यांस एक एक मनुष्य ला- विला आहे. आंसाची त्रिज्या ६ इंच आणि दांडा ५३ फुटी लांब, आणि मनुष्याचें जोर २०० शेरांबरोबर आहे असें मनांत आण. या पक्षी दांड्याची लांबी ५ फुटी आहे, तीस जर आंसाची त्रिज्या ६ इंच मि-- ळविली, तर बेरीज ६ फुटी होईल, ती चाकाची त्रि- ज्या होईल. यावरून ६ इंच आंसाचा त्रिज्येस जशी ७२ इंच चाकाची त्रिज्या, ह्मणजे जसें १ एकास १२,