Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३६
विर्तुभल बिलोसितो.

एकमेकास तोलून धरतात, आणि जर सर्व यंत्र चालू आहे, तर लाविलेल्या वजनांचें जा स्थळांतून गमन घडतें, त्यांस त्या वजनांनीं गुणिलें असतां दोनही गुणाकार बरोबर होतील.

 एक लहान वजन (आकृति ८९, ) चाकाचा परि घास टांगले आहे, तें आंसाचा परिघास दांगिलेल्या दुसऱ्या मोठ्या वजनास उचलून धरितें, असें मनांत आण, तर आंसाची त्रिज्या अथवा परिघ जसा चाका- चा त्रिज्येस अथवा परिघास आहे, तसें लहान वजन मोठ्या वजनास होईल; आंसास खिळलेलें चाक जर एकवार फिरविलें, तर चाकाचा परिघाइतक्या स्थळां- तून लहान वजन खालीं जाईल, आणि त्याच काळांत आसाचा परिघाइतक्या स्थळांतून मोठे वजन वर चढेल आणि हीं स्थळें दोन वजनांशी प्रमाणांत आ- हेत, ह्मणून लहान वजन आणि त्याचा गमनाचे स्थळ ( ह्मणजे चाकाचा परिघ ) यांचा गुणाकार, मोठें वजन आणि त्याचा गमनाचें स्थळ (ह्मणजे आंसाचा परिघ ), यांचा गुणाकाराबरोबर होईल.

 ९१ व्या आकृतीप्रमाणे जेव्हां आंसाचा एक भाग दुसऱ्या भागापेक्षां जाड असतो, तेव्हां ही वरची गोष्ट लागू होये. चाक एक वेळ फिरविलें असतां आंसाचा जाडा भाग अ आणि बारीक भाग व हे दोनही त्याबरोबर फिरतात; आणि त्यासमयीं आंसा- चा जाड्या भागाभोवती दोराचे एक टोंक गुंडाळतें आणि लागलेच दोराचें दुसरें टोंक आंसाचा बारीक