Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आसास खिळलेलें चाक

१३५

किती वजन असावें तें काढण्यासाठीं, जा २०० शेरांस तोलून धरण्याचें आहे, त्यांस कफ अंतराने भागावें; यापक्षीं तें अंतर १० इंच कल्पिले आहे, ह्मणून २०० भागिले १०, तर भागाकार २० येतो; यावरून या यंत्राचा योगानें प स्थळीं २० शेर लाविले असतां ड स्थळीं ४०० शेर तोलितां येतील.

 कांहीपक्षी शक्तीचा व्यापार वारंवार बंद करावा लागतो, तेव्हां वजन वर आल्यानें जो नफा झाला असतो तो तें खालीं गेल्याने सर्व नाहींसा होतो; असें न होऊ देण्यासाठीं आंसास एक चाक बसविलेले असतें, तें ९१ वाव्या आकृतीत दाखविलें आहे. त्या चाकास दांत असतात व ते एक बाजूस लवविलेले अस- तात. एक खुंटी चाकाचा वरल्या बाजूस एका खिळ्या- वर फिरे अशी बसविलेली असत्ये, ती चाकाचा दां- त्यांत येऊन पडत्ये. जेव्हां आंस फिरतो तेव्हां हैं दांत्यांचे चाकही त्याबरोबर फिरतें आणि ती खुंटीही व्या चाकाचा दांत्यांत पडत जाये, आणि जेव्हां शक्ती- चा व्यापार बंद होतो, तेव्हां त्या चाकास परत फिरूं देत नाहीं. या युक्तीने पूर्वी झालेलें कार्य तसेंच ठेवून इच्छेस येईल तेव्हां शक्ति दूर करितां येथे .

 आसाम खिळलेल्या चाकाचा वर लिहिलेल्या वर्ण नावरून असें दृष्टीस येईल कीं, विर्तुल वि विषयीं जो नियम पूर्वी सांगितला, तो जसा उच्चाल- कास लागू होतो, तसा या यंत्रासही लागू होतो; ह्म- णून जर आंसास खिळलेल्या चाकावर दोन प्रेरणा