Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विर्तुअल विलोसेती.

१३७

भागापासून उलगडते. असें झाल्यानें आंसाचा जाडे भागाचा परिघाइतकें दोराचे एक टोंक कमी होतें, आणि आंसांचा बारीक भागाचा परिघाइतकें दोराचें दुसरे टोक लांब होते; यावरून दोन आंसांचा परि- घांचा अंतराइतक्या परिमाणाने सर्व दोर कमी होतो, आणि त्या अंतराचा अर्धाइतक्या स्थळांतून वजन वर येतें. यावरून असें ठरवितां येतें कीं चाकाचा त्रि- ज्येस जसें आसाचा दोन त्रिज्यांचे अर्ध अंतर, अथवा चाकाचा त्रिज्येचे दुपटीस जसें आंसांचा त्रिज्यांचे अंतर, तसे शक्तीचे गमनस्थळास वजनाचे गमनस्थळ होईल; यामुळे शक्तीला तिचा गमनस्थळानें गुणून तो गुणाकार जर, वजन आणि त्याचे गमनस्थळ यांचा गुणाकाराबरोबर येईल, तर शक्ति वजनास तोलून धरील.

 चाकास शक्ति लागू करण्याचा तन्हा अनेक आ- हेत; शक्तीची योजना चाकाचा द्वाराने आसावर करावी ती कधीं कधीं तशी न करितां, ९३ व्या आकृतीप्रमाणे, आंसास एक लोखंडी दांडा बसवि तात, तो उच्चालकाचे काम करितो, आणि त्याचा वाटोळ्या फिरण्यानें चाकाचें काम होतें. या यंत्रानें वि- हिरींतून पोहोन्याने पाणी काढितात, आकृति ९३. विहीर खोल असल्याने कधीं कधीं दोर आसाभोवती एक वेळेपेक्षा अधिक वेळा गुंडाळतो; अशा पक्षी जेव्हां