Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३२
आसास खिळलेले चाक.

अडचणी चुकविण्याकरितां आंसाचा निरनिराळ्या भागांत भिन्नभिन्न तऱ्हेची जाडी दिल्यानें यंत्राचा आंगीं हवी तितकी बळकटी असून तें अवजडही होत नाहीं, आणि त्याचा आंगीं यांत्रिकसामर्थ्यही अधिक आकृति ९१. येतें. ही युक्ति बाजूवरील ९१ व्या आकृतीत दाखविली आहे, त्यांत अ व आंसाचे दोन भाग आहेत, आणि एका भागाचा व्यास दुस- म्याचा व्यासापेक्षां कमी आहे. एक दोर आंसाचा बारीक भागास गु- डाळून, त्याचें दुसरें टोंक एका चाकांतून नेऊन आसाचा जाड भागास उलटें गुंडाळितात, उच्च- लावयाचे वजन दोरांत ओंवलेल्या चाकस टांगलेले असतें. नंतर दोर जाड्या भागा- भवता गुंडाळला जावा अशा रीतीनें जेव्हां आंस फि- रवावा, तेव्हां अर्थातच तो बारीक भागापासून उलग- डतो, आणि चाकाचा एक फेरा झाला असतां, जाड्या भागाचा परिघाइतका दोर वर येतो आणि त्याच काळांत बारीक भागाचा परिघाइतका दोर खाली जातो. यावरून यंत्राचा एक फेऱ्यापासून आंसाचा जाडा आणि बारीक भाग यांचे परिघांचा अंतराइ- तका वजन टांगलेला दोर वर येतो.

 वर सांगितलेल्या यंत्राचें छिन बाजूवरील (९२ वी) आकृति आहे, त्यांत ड वजनास दोराचे अ आणि