Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आसास खिळलेले चाक.

१३१

अव दोरास टांगलेले व वजन, आंसाचा अ क त्रिज्येइतके अंतरावर लावलें आहे ; ब प दोरास टांगलेली पश- क्ति, चाकाचा ब क त्रिज्येचा अंतरावर लाविली आहे; या उच्चालकाची लांब बाजू चाकाचा अर्धव्यासाबरो- बर आहे, आणि तोकडी बाजू आंसाचा अर्धव्यासा- बरोबर आहे; यामुळे उच्चालकाचा आधारावरून, वजन आणि कूपासून त्याचें अंतर (ह्मणजे आंसाचा अर्थ व्यास) यांचा गुणाकार करावा, नंतर शक्ति आणि कूपासून तिचें अंतर ( ह्मणजे चाकाचा अर्धव्यास) यांचाही गुणाकार करावा, आणि जर हे दोनही गुणा- कार बरोबर असतील, तर शक्ति वजनास तोलून ध- रील. यापासून असें दिसतें कीं, चाक जितके मोठे असेल आणि आंस जितका लहान असेल, तितकें यं- त्राचें सामर्थ्य अधिक होईल; परंतु त्याच प्रमाणानें वजन हळू हळू वर चढेल. मार्गे लिहिल्यावरून असें दिसतें कीं, आंसास खिळलेल्ये चाकाची यांत्रिक- शक्ति दोन रीतीनीं वाढवितां येत्ये; आंसाची त्रिज्या कमी केल्यानें, अथवा चाकाची त्रिज्या वाढविल्याने. व्यवहारांत जेथें या गोष्टीचा उपयोग करावा लागतो, तेथें भर शक्तिपेक्षां वजन अतिशय मोठे असले, तर आंस बारिक करावा लागेल, आणि अशानें तो कदा चित् वजनाचा भार सहन करूं शकणार नाहीं, अथ- वा जर चाकाची त्रिज्या मोठी केली तर, तेणेकरून शक्ति अतिशय मोठ्या स्थळांतून लागू करावी लागेल, ह्मणून यंत्र केवळ अवजड मात्र होईल ; या दोनही