Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आसास खिळलेले चाक.

१३३

व भाग उचलून धरितात, आणि त्यांतील प्रत्येक भाग ड वजनाचा अर्धानें वाणिला जातो; जस जसे यंत्र फिरतें त्याप्रमाणे आंसाचा बा- रीक भागापासून जाड्या भागाकडे आकृति ९२. अ इ क दोर जातो; अति मोठ्ये वर्तुळाभों- वतां जोदोर गुंडाळिला आहे, त्यास शक्ति लाविली असये. - फ आणि इ प्रेरणा मध्याचे एकाच बाजूवर लागू होतात, ह्मणून त्याग स्थ ळींचे प्रेरणेस तोलून धरितील हे उघड आहे; आणि ड वजनाचा भार दोराचा अ आणि व भागांनी बरोबर उचलिला आहे, ह्मणून इ स्थळींची प्रेरणा ग जवळचा प्रेरणेबरोबर आहे, आ णि जर क इ अंतर ग क अंतराबरोबर असेल, तर प शक्ति वांचून नुसती इ प्रेरणा ग प्रेरणेंस तोलून ध रोल; आतां उच्चालकाचा मुळकारणावरून प आणि इ यांचे मोमेंटग चा मोमेंटाबरोबर असावे; याव- रून जर पला चाकाचा त्रिज्येनें गुणिलें, आणि अर्ध वजनास आंसाचा बारीक भागाचा त्रिज्येने गुणून या दोन गुणाकारांची बेरीज घेतली, तर बाकीचें अर्ध- वजन आणि आंसाचा जाड्या भागाची त्रिज्या यांचा गुणाकार येईल. यावरून असे दिसतें कीं, चाका- ची त्रिज्या हाच एक उच्चालक आहे, त्या त्रिज्येनें जर शक्तीस गुणिलें तर तो गुणाकार, अर्धवजनास आसा