Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३०
आसास खिळलेले चाक.

काचा परिघाइतका दोर सुटा होईल हे उघड आहे; परंतु चाकाचा एक वेढ्याबरोबर आंसा- चा ही एक वेढा होतो; यामुळे जा दोरास वजन टां- गिलें असतें, तो दोर आंसाभोवता एक वेळ गुंडा- ळतो, आणि तेणेंकरून आंसाचा परिघ जितका असेल तितकें वजन वर येतें. यावरून चाकाचा परिघास जसा आंसाचा परिघ प्रमाण आहे, तसा शक्तीचा वेग बजनाचा वेगास प्रमाण होईल. चाक आणि आंस यांमधील प्रमाणाइतकें, जर शक्ति आणि वजन यांतील प्रमाण असेल, तर हे यंत्र समतोल राहील; यावरून असे दिसतें कीं, चाकाचा व्यास आणि आंसाचा व्यास यांमध्ये जे प्रमाण असतें, तें या यंत्राची शक्ति दाख- वितें. जसे, चाकाचा व्यास १२ इंच आणि आंसा- चा व्यास १ इंच आहे असे मनांत आण. तर १ तो- ळ्याची शक्ति चाकास लाविली असतां, आंसावर १२ तोळ्यांचा वजनास तोलून घरील; आणि याहून किं चित् अधिक प्रेरणा लागू केली असतां, आंसासहित चाक फिरेल आणि वजन वर येईल. आंसास खि- आकृति ९०. व अ ळलेले चाक एक सततवर्ती उच्चा- लक आहे. ९० वी आकृति वर- चा यंत्राचें छिन आहे, आणि त्याचा व्यापार उच्चालकासारिखा कसा होतो हे दाखविले. यंत्राचा मध्यांतून अ पा सून ब पर्यंत जी रेघ जाये, तो उच्चा लक आहे आणि त्याचा मध्य क आहे;