Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ओसास खिळलेले चाक.

१२९

प्रेरणेनें चाक फिरवितात आणि त्याचा योगानें आंसही फिरतो; एक दोर चाकास कोठे तरी बांध- लेला असून तो चाकावर गुंडाळिलेला असतो, त्याचा योगाने वरची गोष्ट घडत्ये, दुसरा एक दोर आंसास बांधिलेला असतो आणि जेव्हां चाकाबरोबर आंस फिरतो तेव्हां त्याभोवता तो गुंडाळतो. जो आंसा- चा दोर खाली लोंबत असतो, त्यास वजन टांगितात; आणि चाकाशीं लाविलेली शक्ति, चाकास व आंसास फिरवित्ये, ह्मणून आंसाचा दोरानें वजन वर येते. यंत्रा- चा या वर्णनावरून असें लक्षांत येईल, कीं त्यावर दोन विरुद्ध प्रेरणा आहेत, आणि त्या एकमेकास वि- रुद्ध अशा रीतीनें लागू आहेत, त्यांतील एक प्रेरणा वजन आहे, ती यंत्रास एक बाजूनें फिरविले, आणि दुसरी प्रेरणा शक्ति आहे, ती त्यास दुसऱ्या बाजूस फिरविले. या दोन प्रेरणा साधारण आंसापासून निरनिराळ्या अंतरांवरून लागू होतात; आंसाचा त्रिज्येइतक्या अंतरावरून वजन लागू होतें, आणि चा- काचा त्रिज्येइतके अंतरावरून शक्ति लागू होये. बाजूवरील आकृति ८९. (८९व्या आकृतींत ) एक चाक आणि त्यास बसविलेला आंस आहे, आणि आंसाबरोबर तें चाक फिरतें; जर चाकावरचा दोरास हिसका देऊन चाक एक वेळा फिरविलें, तर चा-