Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अध्याय ८.
आंसास खिळलेले चाक.

 पदार्थास चलन देण्याचा उच्चालकाचा व्यापार थोडा थोडा आणि विसांव्याने घडतो असे पूर्वी दाख- विलें. ५८व्या आकृतींत वजन व पासून क पर्यंत चढ- ल्या नंतर तीच कृति पुनः करण्यासाठी, उच्चालकास पुनः आपल्या पूर्व स्थितीवर यावे लागतें. आणि त्या- चा या परत येण्याचा काळांत, वजन दुसन्या कांहीं उपायानें उचलून धरिलें पाहिजे. जेव्हां लहान शक्तीनें मोठें वजन थोड्या स्थळांतून उचलावयाचे असते, ते व्हां मात्र उच्चालकाचा उपयोग करितात, आणि अशाच प्रसंगी त्यापासून इच्छिलेले फळ उत्पन्न होते.

 उच्चालकाचा व्यापार हवा तितका वाढवितां यावा, आणि तो अखंड व्हावा, याकरितां आंसास खिळलेले चाक ही एक योजना आहे; त्यांत एका चाकास आंस खिळलेला असतो, असा कीं तीं दोनही एक- दांच फिरावीं, त्यांत शक्ति चाकाचा परिघाशीं लावि- तात, आणि जॅ. वजन उचलावयाचें असतें तें एका दो- रास बांधलेले असते आणि तो दोर आंसाभोवती गुंडाळतो. या यंत्राचा उपयोग पुढील रीतीने कार तात; आंसाचीं दोन टोंकें आडवीं ठेविलीं असतात, अशीं कीं चाक आणि आंस यांचा जो साधारण आंस त्याभोवती तें सर्व यंत्र सहज फिरावें. कांहीं