Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दोन टॅकंवर ठेविलेले बहाल.

१२७

नाचा भार त्या दोन टेंकूंवर पडतो, त्याची गणना मा- गील लिहिलेल्या कारणावरून करितां येईल. जर ब आधारावरील भार शक्ति असें मानिलें आणि ती शक्ति व वजनास दुसऱ्या प्रकारचा ब अ उच्चालकाचा यो गार्ने उचलून धरित्ये असें मानिलें, तर शक्ति आणि, उच्चालकाची ब अ सर्व लांबी यांचा गुणाकार, वजन आणि क अ तोकडी बाजू यांचा गुणाकाराबरोबर हो- ईल. जर अब उच्चालकाचा एक तृतीयांश अक आणि दोन तृतीयांश क ब असेल, तर ब वर सर्व वज- नाचा एक तृतीयांश भार पडेल, आणि अ वर बाकीचे दोन तृतीयांशांचा भार पडेल. या उदाहरणापासून हे उघड होतें कीं, जर ब आणि अ यांचा बरोबर मध्यभागीं तें वजन टांगिलें, तर प्रत्येक आधारावर त्या वजनाचा निमे भार पडेल.

_________