Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाकडा उच्चालक. तिर्कस लागू होणे

१२३

आणि शक्ति अइ दिशेत उच्चालकावर तिर्कस लागू हो- त्ये, आणि वजन ब स दिशेत लागू होतें. या उच्चालकाचा सामर्थ्याची गणना करण्या-साठीं, मागील उदाहरणाप्र माणें रेघा काढाव्या. याज- अ आकृति ८२. ड फ इ व प करितां जर इ अ, स व रेघा वाढविल्या आणि टेंकूपा- सून या रेघांस क फ आणि फड लंब काढिले तर, शक्तीस क फ रेघेनें गुणिलें असतां गुणाकार, शक्ती- चा मोमेंट होईल, आणि वजनास फ ड रेघेनें गुणिलें असतां गुणाकार त्याचा मोमेंट होईल; जर प ४ तोळे, आणि क फ रेघ ६ इंच, आणि व ८ तोळे, आणि फड रेघ ३ इंच असेल, तर तुलना होईल, कारण (४x६= ८×३).

 पुढील आकृतींत वर सांगितल्याप्रमाणे शक्ति आणि वजन हीं उच्चालकावर तिर्कस लागू होतात, तथापि वरचा सारिखा हा उच्चालक सरळ नाहीं, वांकडा आहे. उच्चालक जरी वांकडा आहे, तरी गणण्याचा रीतींत कांहीं फेर पडत नाहीं, यावरून ( ८२ व्या आकृतीप्रमाणें ) या उच्चालकाचा सामर्थ्याची गण- ना करितां येईल. अ ड रेघ वाढीव आणि फ बिंदूपासून त्या
आकृति ८३. म E न भ ब फ उ