Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२४
वांका उच्चालक तिर्कस लागू होणें.

रेघेवर लंब कर, तो लंब उच्चालकाची लांब बाजू हो- ईल, त्याचप्रमाणे ग व रेघ वाढवून फ पासून तिजवर लंब केला असतां तो लंब तोंकडी बाजू होईल; नंतर शक्ति आणि वजन यांचे मोमेंट मागील उदाहरणा- प्रमाणे काढावे.-


 कधीं कधीं उच्चालक इतका वांकडा असतो कीं उ- च्चालकाचा बाजू एकमेकावर लंब असतात; आणि फ आकृति ८४. व अ प टेंकू त्यांचे काटकोनाचे कोनबिंदूंत असतो, ( आकृति ८४ ), अशा उ- चालकास काटकोनउच्चालक - णतात. त्यांत व वजन फ क तो- कड्या बाजूस टांगिलें असतें, आणि प शक्ति अ फ लांब बाजूपासून टां- गिली असत्ये; या पक्षीं प शक्तीला अ फ नें गुणिलें असतां शक्तीचा मोमेंट येतो, आणि व वजनास फ क नें गुणिलें असतां वजनाचा मोमेंट होतो; जर हे मोमेंट बरोबर असतील, तर तुलना हो- ईल. शक्ति लंबरूपानें टेंकूवर लागू होत्ये असें न मा- नितां, पुढील आकृतीत दाखविल्या- प्रमाणें तिर्कस लागू होत्ये. (आकृति ८५) अशी कल्पना केली, तर अशा उच्चालकाचा सामर्थ्याचा गणण्याची रीति ८३ व्या आकृतीप्रमाणेंच आहे. या पक्षीं शक्तीचा अ प दिशेस टेंकूपा- सून एक लंब केला पाहिजे, तो लंब
क आकृति ८५. अ फ0 प