पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रथम टाकावू लोकर तीन-चार वेळा धुवावी. नंतर वाळवावी, त्यानंतर तीला पिजावे. पिंजलेल्या लोकरीचे पुंजके गरजेप्रमाणे व तयार करावयाच्या वस्तूच्या आकारमानाप्रमाणे साफ व मजबूत लाकडावर किंवा जमिनीवर अंथ- शिवेत एक थर झाल्यावर त्यावर लिसापोल किंवा साबनाचे पाणी शिंपडावे आणि त्यावर पाईप किंवा समान दाब बसेल असा लाकडाचा रुळ फिरवावा पुन्हा गरजे प्रमाणे लोकरीचे पुंजके टाकून वस्त्र समान भरुन घ्यावे. व पून्हा भरपूर दाब देवून दळ फिरवावा म्हणजे हव्या त्या जाडीचे व आकाराची वस्तू तयार होते. यालाच | नमदा म्हणतात. असे नमदे स्टुलवर आसन पट्टी टाकून किंवा बैठकीत सजा- | वटीसाठी अनेक ठिकाणी वापरले जातात. विविध आकाराचे आणि रंगाचे नमदे तयार करणे ही एक कला आहे. ज्यात ही अवगत होईल. त्याचा टाकावू लोकरीतून उत्पादन व उत्पन्न सहजपणे काढता येईल. फिनिशिंग आणि रंगाओ : परंपरागत पद्धतीने तयार केलेल्या घोंगडचा ओबड-धोबड असतात. त्याचे | फिनिशिंग जवळ-जवळ झालेलेच नसते घोंगडी मऊ, साफ व स्वच्छ दिसण्यासाठी तयार झालेली घोंगडी हौदांत किंवा मोठ्या भांड्यात गरम पाणी करुन त्यांत साबन किंवा सोडा मिसळून ते पाणी एक जीव करा व त्यात घोंगडी चार ते सहा तास भिजत ठेवा. मधून-मधून घोंगडी चोळा नंतर ती खेळत्या पाण्यात धुवून घ्या. आणि गोल पायीपवर किंवा लाकडाच्या गोल दांडीवर निटपणं लपेटून ठेवा. पाण्याचा पूर्ण निचरा होऊन घोंगडी बाळल्यानतर ती काढून मिट घडी घाला. अशाप्रकारे तयार झालेली घोंगडी ही जास्त सुबक दिसते काही लोक पाण्यात | घासलेट टाकूण घोंगडी भिजवतात. चोळून धूतात आणि वाळवतात. काळ्या लोकरीस सहसा रंग देता येत नाही. म्हणून घोंगडीमध्ये रंगीत | डीझाईन टाकावयाचे असल्यास किंवा काळ्या रंगाशिवाय इतर रंगाची धोंगडी तयार करावयाची असल्यास त्यासाठो पांढव्या रंगाच्या सूताचा उपयोग करावा. प्रथम पाणी उकळावे पाण्यांचा कांही भाग लहान भांडघात घेऊन त्यात हवा असलेला रंग घोळावा. उकळलेल्या पाण्यात प्रथम मोठ टाकावे. नंतर लिंबू पिळाचे. त्यात घोळलेला रंग निटपणे मिसळावा आणि सूत ५ ते १० मिनिटे बुडवून ठेवावे नंतर ते सूत पिळून वाळवावे. नंतर विणकामास वापरावे १ किलो सूतास रंग देण्यासाठी ५ लिटर पाण्यात ५ ग्रॅम रंग वापरावा. ८६