पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मेषपालन आणि लोकर उद्योगाचे प्रशिक्षण सुरू करतांना हा दृष्टिकोण आमच्या समोर आहे. ज्या भागात लोकर तयार होते त्याच भागात लोकरीची वस्त्रे तथा झाली तर त्यातून होणारा नफा त्याच भागातील लोकांना मिळेल. शिवाय लोका उद्योगात अनेकांना काम मिळेल. आणि बेकारीची दरी कांही अंशी कमी होई असे आम्हाला वाटते. कारण एक हातमाग १२ महिने चालला व केवळ घोंगडी उत्पादन -सतत करीत राहीला तर व्यवसाय करणाराची बेकारी संपतेच त्या बरोबर तो गांवातील २० स्त्रियांना सूतकताईचे काम १२ महिने देऊ शकतो. शासकीय आणि निमशासकीय संस्थानी या उत्पादित मालास बाजार पेठ उपल करून दिली तर या तालुक्यातील डोंगरी भागातील बेरोजगारी १० % कमी करत येईल. अशी आमची खात्री. आहे..... मेषपालन आणि लोकर उद्योगाची एकत्र माहिती असलेले पुस्तकं मरा- - ठीतून जवळपास नाहीच, मेंढ्यांचे संगोपन करणे सोपे आहे. परंतु त्यांच्य आजाराची प्राथमिक उपचार पद्धती माहीत नसेल तर उपचारासाठी डॉक्टरल आणेपर्यंत कांही वेळेस कळपच्या कळप मृत्युमुखी पडलेले आम्ही पाहिले आहेत म्हणून या पुस्तकात प्रादेशिक उपसंचालक, पशुसंवर्धन खाते औरंगाबाद यां तर्फे प्रकाशित झालेली "शेळ्या मेंढ्याचे प्रमुख रोग" ही पुस्तिका जवळपास तसीच छापली आहे. लोकरीचा व्यवसाय सुरु करण्याच्या दृष्टीनेही प्राथमि माहिती दिली आहे. ही पुस्तिका तयार करण्यासाठी अंबाजोगाईच्या पशुसंवर्धन केंद्राचे डो कलमे, मेंढी फॉर्मचे डॉ. जगताप यांचे सहकार्य मिळाले. खादी उलन केंद्र, बीड श्री. चौधरी यांनी लोकर, विणकामासंबंधी मदत केली. त्यामुळे त्यांचा ऋणनिर्दे करणे आमचे कर्तव्य आहे. संस्थेचे श्री दिलीप बेलूरकर, आणि मंगल देशपांडे यांनी पुस्तकाचे टाच तयार करण्यास हातभार लावला. त्यामुळे पुस्तक - मार्गी लागले. ऑक्सफॉर 'इंडिया ट्रस्टने छपाईसाठी आर्थिक सहकार्यं केले. आणि स्वामी रामानंद ती सहकारी मुद्रणालय मर्यादित अंबाजोगाईचे, सचिव श्री. नानासाहेब गाठाळ आणि त्यांचे सहकारी श्री. नागनाथ दत्त (कंपोझिटर), श्री. व्यंकट सोळंके ( बाईन्डर) यांनी छपाईसाठी सहकार्य केले. जर्याहब मुद्रणालय, औरंगाबाद यांनी थोड अवधीत मुखपृष्ठ तयार करून दिले. या सर्वाच्या हार्दिक सहकार्यामुळेच मेषपाल व लोकर उद्योग या पुस्तकाची छपाई होऊ शकली.