पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना मानवलोकचे विविध रचनात्मक उपक्रम चालू आहेत. १९८२ पर्यंत महा- राष्ट्र आरोग्य मंडळ हडपसरची शाखा म्हणून आम्ही कार्य करीत होतो. त्यांच्या आरोग्य व ग्रामपुर्नरचना प्रकल्पाचे क्षेत्र या "तालुक्यातील प्रामुख्यानी डोंगरी भागात वसलेली खेडी हेच होते. दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणाऱ्या, या खेडयातील साठ सत्तर टक्के माण- साच्या आर्थिक पुर्नरचनेचा विचार सुरु झाला, तेव्हा त्या खेड्यातील उत्पादनाची . साधने कोणती याची पाहणी करण्यात आली. या डोंगरी भागांत मेंढ्यांचे प्रमाण खूप मोठे आहे. मात्र मेंढ्यांचे पालन, पोषण, संगोपन आणि लोकर विक्री या पेक्षा पुढे काहीही करण्याची इच्छा त्यांची दिसली नाही. शासनाच्या पशुसंवर्धन कार्यक्रमाअंतरगत एस. एल. पी. पी. खाली गरजू मेंढपाळाना, मँढ्यांचा एक कळप (युनिट) घेण्यासाठी बॅन्केकडून लोने व त्यावर सबसीडी मिळत असे. या संधीचा फायदा घेण्यासाठी काही लोक पुढे येत परंतु त्यांना मेंढया सांभाळणे व वाढविणे या पेक्षा पुढचेमार्गदर्शन कोणी करीत नव्हते. आणि म्हणूनच या भागातील मेंढपाळाची पिळवणूक होत आहे असे आम्हाला वाटते.. मेंढी हा बहुउपयोगी प्राण आहे. त्यांच्या सर्व अवयवांचा उपयोग धंदा म्हणून केला तर त्यातूत मेंढपाळाची आर्थिक परिस्थिती निश्चित सुधारेल पण मेंढपाळ मेंढयासांभाळतो वाढवतो. आणि त्याची लोकर व्यापान्योला बेभाव विकून मोकळा होतो. हीच लोकर व्यापारी हरियाणा, राजस्थानकडे पाठवून त्यावर भरपूर नफा कमवतो. हरियाणा, राजस्थानचे लोकर उद्योगवाले त्याच्या घोंगड्या, ब्लॅकेट, गालीचे, नमदे तयार करतात आणि भरपूर नफा कमवतात:- उत्पादनाची साधने ज्यांच्या हाती आहेत त्यांच्या हातीच पक्का माल तयार करण्याचे साधन उपलब्ध झाले तर नफाही त्यांच्याच हातात राहील, कच्चामाल तयार करणारा वेगळा आणि पक्का माल तयार करना विकणारा वेगळा असे चित्र आपल्या देशात आहे त्यामुळे कन्यामालाचे उत्पादन करणारे दरिद्री राहतात. पक्कामाल तयार करून विकणारे श्रीमंत होत जातात. मेंढपाळाचेही असेच झाले आहे. "