पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चांगल्या संगोपनाच्या दृष्टीने पुढील गोष्टी ध्यानात ठेवाव्यात मेंढ्यांना चारावयाच्या रानात जंतांचे प्रदूषण नसावे. गवती रानात वाजवीहून अधिक मेंढया चारण्याने तसेच दलदलीच्या किंवा | रानात जंत झालेल्या मेंढया चारल्याने गवती राने दूषित होतात. मेंढ्यांना स्वच्छ वाहत्या पाण्यावर पाणी पाजवावे. तळी, डबकी इत्यादी ती व काही प्रकारच्या जंतूंनी दूषित असण्याचा धोका असतो. | खांडात नवींन मेंढया सोडण्यापूर्वी त्यांना ३-४ आठवडे पृथक ठेवावे म्हणजे आजार आपल्या खांडात पसरणार नाहीत. : मेंढ्यांचे वाडे स्वच्छ, कोरडे, हवेशीर व भरपूर उजेड मिळेल असे असावेत. मेंढयांना पुरेशी जागा मिळावी. "20 मेंढ्यांना नियमितपणे रोगांची लस टोचून घ्यावी व जंतुनाशक औषधोपचार मेंढ्यांचे वाडे, मावारे व गवती राने वरचेवर स्वच्छ करावेत. मेंढ्यांच्या आजारांवर सतत नज़र ठेवावी आजारी मेंदूचा ताबडतोब बाजूला त्यांच्या औषधोपचाराची व पोषणाची योग्य व्यवस्था करावी. मैदयांचे हवामानातील अचानक बदलापासून विशेषतः ओल कडाक्याची ब कडक उन्हापासून संरक्षण करावे. ३५