पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२ भारतातील मेषपालन पूर्वेतिहास - मोहोंजोदारोच्या उत्खननात ज्या अनेक वस्तू व शिल्पे सापडली त्या मेंढीच्या हाडाचे सापळेही सापडले. अथर्ववेद आणि ऋग्वेदातही मेढयांच उल्लेख आहे. वैदिक आर्यांच्या पाळीव पशूत 'मेष' म्हणजे मेंढयाला महत्वा स्थान होते. वैदिक वाङमयात याचा अनेकदा उल्लेख आलेला आहे. " यज्ञात सोमरस गाळण्यासाठी याच्या लोकरीचा उपयोग करीत. लोकरी पासून मऊ आसन तयार करीत. मांस खाण्यासाठी मेंढ्यांचा उपयोग करीत यज्ञात हवी म्हणून हत्या करीत. मेंढा आपल्या लोकरीने मनुष्याचे शीत निवार करतो म्हणून त्याला माणसे व इतर प्राणी यांचे 'संरक्षक प्रावरण' असे वार्ड सनेयी संहितेत म्हटले आहे. गांधार देशातील मेंढया लोकरीसाठी प्रसिद्ध होत्य त्या काळी मेंढयांचे तीन प्रकार मानले होते. चोलिक, चटिल व शोणक मोठ्या तोंडाचा, गोंडेदार शेपटाचा मेंढा शुभ मानला जाई. वात्सायनाच्य कामसूत्रात मेंढ्यांच्या झुंजीचा उल्लेख आहे. पाश्चिमात्य मेंढ्यांची आवक आपल्या देशात परकियांच्या आक्रमणा बरोबरच झाली. विशेषतः महाराष्ट्रात संकरित जातीची आवक अठराव्य शतकापासून सुरु झाली. आज भारतात चार कोटी मेंढया आहेत. जगातील 20 मेंढया आपल् देशात आहेत. देशाच्या सर्वच प्रांतात कमी अधिक प्रमाणात विविध जातीच् मेंढया पहावयास मिळतात.