पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करणे, प्रयत्नातून आनंद मिळणे, सततच्या आनंदमय प्रयत्नातून त्या विषयाच्या गाभ्याचे प्रत्यक्ष ज्ञान होते. त्या विषयाची साधना आपली होते. आपण तिच्यामध्ये एकरूप होतो. ही शरीर-श्वसनाशी एकरुपता सहज व्हावी यासाठी खालील सराव दररोज किमान एकदा तरी कराच. श्वसन सराव एक सूचना रात्री गादीवर पाठ टेकली की प्रथम डोक्याखालची उशी काढून टाका. पूर्वेकडे डोकं येईल असे पाठीवर झोपा. दोन्ही हात शरीराच्या बाजूला सरळ ठेवा. उशीशिवाय झोपण्याची सवय नाही म्हणून मेरुदंडावर लगेच ताण जाणवतो. सर्व मणके मोकळे करा. कुठेही स्नायूपेशी अवघडलेल्या नाहीत, ताणल्या गेलेल्या नाहीत, कडक झालेल्या नाहीत याकडे लक्ष द्या. हाताचा उजवा पंजा डाव्या काखेत व डावा पंजा उजव्या काखेत ठेवा. आंगठे बाहेर काढा. हाताची घडी छातीवर ठेवा. शरीर मोकळे सोडा. एक बारका श्वास घ्या. तो छातीत जमा करा. छातीवर मन केंद्रित करा. हाताची घडी वर उचलली जाते. छाती पकडून ठेवा. थोडं थांबा. श्वास मोकळा करा. तीन सर्वसाधारण श्वास घ्या. (पोट ओटीपोटाचे स्नायू हळू हळू ढिले पडतील. छातीत घेतलेला श्वास व्यवस्थित पकडता आला आहे. पोटावर दाब पडून ते खपाटीला जाते आहे.) दुसरा श्वास थोडा दीर्घ घ्या. तो छातीत जमा करा. छातीवर मन केंद्रित करा. हाताची घडी वर उचलली जाते. छाती पकडून ठेवा. पाठीकडील कोणत्याही मणक्यावर ताण दाब येत नाही याकडे लक्ष द्या. थोडं थांबा. श्वास मोकळा करा. तीन सर्वसाधारण श्वास घ्या. तिसरा श्वास अधिक दीर्घ घ्या. तो छातीत जमा करा. छातीवर मन केंद्रित करा. हाताची घडी वर उचलली जाते. छाती पकडून ठेवा. पाठीकडील कोणत्याही मणक्यावर ताण दाब येत असल्यास श्वास सोडून द्या. श्वासाची मात्रा कमी करून पुन्हा प्रयत्न करा. थोडं थांबा. श्वास मोकळा करा. तीन सर्वसाधारण श्वास घ्या. मेदवृद्धीतून मुक्ती ९८