पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एक श्वास तीन टप्यात घेण्याचा प्रयत्न करू. प्रथम बारका श्वास घ्या, छातीत पकडून ठेवा. थांबा. छाती उचलली जाते. पाठीचे स्नायू मोकळे. दुसरा श्वास थोडा दीर्घ घ्या. छातीत पकडून ठेवा. छाती उचलली जाते. थांबा. पाठीचे स्नायू मोकळे. तिसरा श्वास अधिक दीर्घ घ्या. छातीत पकडून ठेवा. छाती उचली जाते. थांबा. पाठीचे स्नायू मोकळे. श्वास सोडून द्या. तीन सर्वसाधारण श्वास घ्या. एक श्वास तीन टप्यात घेण्याचा प्रयत्न आणखी दोन वेळा करा. या प्रकारचा सराव साधारणपणे तेरा आठवडे करा. नंतर दररोज हा प्रकार करणे गरजेचे नाही. अनाहत चक्र पकडणे, वर उचलणे व पोटाचे स्नायू ताण रहित ठेवणे यासाठी हा सराव गरजेचा आहे. श्वसन सराव दोन- सरावासाठी सूचना सूर्यनमस्कार घालण्यास सुरूवात करण्यापूर्वी हा प्रकार करा. आसनाची घडी मोकळी करा. सतरंजी सारखे जमिनीवर टाका. पूर्वेकडे डोकं येईल असे पाठीवर झोपा. दोन्ही हात शरीराच्या बाजूला सरळ ठेवा. पंजे जमिनीकडे किंवा आकाशाकडे. जसे सोईचे असेल तसे. उशीशिवाय झोपण्याची सवय नाही म्हणून मेरुदंडावर लगेच ताण जाणवतो. सर्व मणके मोकळे करा. पाठीवर कुठेही स्नायूपेशी अवघडलेल्या नाहीत, ताणल्या गेलेल्या नाहीत, कडक झालेल्या नाहीत याकडे लक्ष द्या. एक बारका श्वास घ्या. तो छातीत जमा करा. छातीवर मन केंद्रित करा. छाती पकडून ठेवा. थोडं थांबा. श्वास मोकळा करा. तीन सर्वसाधारण श्वास घ्या. पोट ओटीपोटाचे स्नायू हळू हळू ढिले पडतील. छातीत घेतलेला श्वास व्यवस्थित पकडता आला आहे. पोटावर दाब पडून ते खपाटीला जाते आहे. दुसरा श्वास थोडा दीर्घ घ्या. तो छातीत जमा करा. छातीवर मन केंद्रित करा. छाती उचला. पकडून ठेवा. पाठीकडे कोणत्याही मणक्यावर ताण दाब येत नाही याकडे लक्ष द्या. थोड थांबा. श्वास मोकळा करा. तीन सर्वसाधारण श्वास घ्या. तिसरा श्वास अधिक दीर्घ घ्या. तो छातीत जमा करा. छातीवर मन केंद्रित करा. छाती पकडून ठेवा. पाठीकडील कोणत्याही मणक्यावर ताण दाब येत असल्यास मेदवृद्धीतून मुक्ती ९९