पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

'अ' चा उच्चार ऐका. शरीरातील वायूचे गुणधर्म चलन- वलन - आकुंचन-प्रसरण-निरोध याकडे लक्ष देत 'ऊ' चा उच्चार ऐका. शरीरातील आकाशाचे गुणधर्म काम-क्रोध-मोह-शोक-भिती याकडे लक्ष देत 'म' चा उच्चार ऐका. ध्वनिस्पंदनामुळे शरीरातील अग्नी - वायू - आकाश यांचे गुणधर्म प्रभावित होत आहेत त्याकडे लक्ष द्या. शरीरामधील या तीनही ठिकाणच्या अवयवांकडे क्रमाने लक्ष द्या. वापरलेले प्राणतत्त्व येथूनच मोकळे होते आहे याकडे लक्ष द्या. सूचना- आंघोळ, मर्मबिंदू, ॐ कार हे तीन शरीर संचलनाचे प्रकार आपण बघितले. दररोज सूर्यनमस्कार घालण्यास सुरूवात करण्यापूर्वी आंघोळ आणि टाळ्यांचे प्रकार करायचे आहेत. नंतर सर्वांग सजगता हा तिसरा शरीर संचलनाचा प्रकार पूर्ण करून सूर्यनमस्कार घालण्यास सुरूवात करायची आहे. सूर्यनमस्कार घालतांना काही चूक झाली, पाठ-कंबर, स्नायू-सांधे यामध्ये वेदना सुरू झाल्यास ॐ काराचा सराव व पुढे दिलेला श्वसनाचा सराव आवश्य करायचा आहे. श्वसन सराव श्वास घेणे आणि सोडणे ( पुरक व रेचक) या बद्दलच्या सूचना डोळ्यांनी वाचल्या, मनाच्या लक्षात आल्या, बुद्धीला समजल्या सुद्धा आहेत. योग्य पद्धतीने पूरक- रेचक करणे म्हणजेच सूर्यनमस्कार घालण्यासाठी अनाहतचक्र पकडणे होय. पण जोपर्यंत या सर्व सूचनांचा प्रत्यक्ष अनुभव शरीराला येत नाही तोपर्यंत त्या शरीराला अनोळखी असतात. अनोळख्याशी बोलतांना-वागतांना - संवाद साधतांना मनावर दडपण येते. सहजता संपते. सहवास वाढला की चांगला परिचय होतो, गट्टी जमते. कारण प्रत्यक्ष अनुभव म्हणजेच शाश्वत ज्ञान. ज्ञान मिळविण्यासाठी सततचा प्रयत्न मेदवृद्धीतून मुक्ती ९७