पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वापरलेले प्राणतत्त्व येथूनच मोकळे होते आहे याकडे लक्ष द्या. तीन सर्वसाधारण श्वास घेऊन वायू ॐ करण्यास सुरूवात करा. वायू ॐ दोन सूचना- वायू ॐ च्या सूचना वर दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे कृती करा. तीन सर्वसाधारण श्वास घेऊन नाद ॐ दोन करण्यास सुरूवात करा. नाद ॐ दोन सूचना- दीर्घ श्वास घ्या. (पूरक करा.) रेचक करतांना ॐ चा उच्चार नाद ॐ एक मध्ये दिलेल्या सूचनेप्रमाणे करा. ‘अ’चा उच्चार मणिपूरचक्रातील अग्नीकडे लक्ष देत ऐका. ‘ऊ’चा उच्चार अनाहत चक्रातील वायूतत्त्वाकडे लक्ष देत ऐका. 'म'चा उच्चार आज्ञाचक्रातील आकाश तत्त्वाकडे लक्ष देत ऐका. ध्वनिस्पंदनामुळे शरीरातील अग्नीतत्त्व, वायूतत्त्व, आकाशतत्त्व प्रभावित होत आहेत त्याकडे लक्ष द्या. शरीरामधील या तीनही ठिकाणच्या अवयवांकडे क्रमाने लक्ष द्या. वापरलेले प्राणतत्त्व येथूनच मोकळे होते आहे याकडे लक्ष द्या. तीन सर्वसाधारण श्वास घेऊन वायू ॐ करण्यास सुरूवात करा. वायू ॐ तीन सूचना - वायू ॐ च्या सूचना वर दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे कृती करा. तीन सर्वसाधारण श्वास घेवून नाद ॐ तीन करण्यास सुरूवात करा. नाद ॐ तीन सूचना - - दीर्घ श्वास घ्या. (पूरक करा.) रेचक करतांना ॐ चा उच्चार नाद एक मध्ये दिलेल्या सूचनेप्रमाणे करा. शरीरातील आणि निसर्गातील अग्नी-वायू- आकाश यांचे गुणधर्म एकच आहेत. शरीरातील अग्नीचे गुणधर्म खाणे-पिणे-झोप- विश्रांती-कार्यशक्ती याकडे लक्ष देत मेदवृद्धीतून मुक्ती ९६