पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्वास सोडण्याची क्रिया (रेचक) वर दिलेल्या सूचनेप्रमाणे करा. श्वासाचा आवाज ऐकत तीन टप्प्यात तो सोडायचा आहे. श्वासाचा पहिला टप्पा पोटावर लक्ष केंद्रित करून सोडायचा आहे. तेथील मांस पेशींमध्ये तयार झालेली नादस्पंदने स्वीकारायची आहेत. श्वासाचा दुसरा टप्पा छातीवर लक्ष केंद्रित करून सोडायचा आहे. तेथील मांस पेशींमध्ये तयार झालेली नादस्पंदने स्वीकारायची आहेत. श्वासाचा तिसरा टप्पा कपाळावर लक्ष केंद्रित करून सोडायचा आहे. तेथील मांस पेशींमध्ये तयार झालेली नादस्पंदने स्वीकारायची आहेत. तीन सर्वसाधारण श्वास घेवून नाद ॐ करण्यास सुरूवात करा. नाद ॐ एक सूचना- दीर्घ श्वास घ्या. पूरक करा. रेचक करतांना ॐ चा उच्चार करा. ॐ चा उच्चार तीन मात्रांमध्ये करावयाचा आहे अ+ऊ+म. यांचा उच्चार चढत्या क्रमाने करावयाचा आहे. - 'अ' चा उच्चार दोन सेकंद केला तर 'ऊ' चा उच्चार चार सेकंद करा आणि 'म' चा उच्चार आठ सेकंद करा. 'म'चा उच्चार करतांना ओठ बंद ठेवा. 'अ'चा उच्चार पोटामध्ये ऐका. 'ऊ'चा उच्चार छातीमध्ये ऐका. 'म'चा उच्चार मस्तिष्क मध्ये ऐका. ध्वनिस्पंदनामुळे पचन संस्था, श्वसन संस्था, मज्जा संस्था प्रभावित होत आहेत त्याकडे लक्ष द्या. सर्व प्रकारचे रोग-व्याधी-विकार-व्यसन हे पचनसंस्थेचे विकार, श्वसनसंस्थचे विकार, मज्जासंस्थेचे विकार यामध्ये मोडतात. शरीरात असलेले अग्नीतत्त्व, वायूतत्त्व, आकाशतत्त्व यांचे संतुलन बिघडले की हे विकार सुरू होतात. या विकारांची सुरूवात अपचनापासून होते. शरीरामधील या तीनही ठिकाणच्या अवयवांकडे क्रमाने लक्ष द्या. मेदवृद्धीतून मुक्ती ९५