पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आहे. मंद झालेला जठराग्नी प्रज्वलित करायचा आहे. त्यासाठी त्याला प्राणतत्त्वाचा पुरवठा अधिक प्रमाणात करायचा आहे.

  • दीर्घ श्वसन करतांना श्वास घेण्यासाठी जेवढा वेळ लागेल त्याच्या दुप्पट वेळ

छातीमध्ये श्वास पकडून ठेवा. तेवढाच वेळ लावत श्वासाचा आवाज ऐकत श्वास सोडा. आवाज संपला तरी ओटीपोट आत ओढून तो भाग पूर्ण रिकामा करायचा आहे.

  • पार्श्वभागाच्या स्नायूंवर किंवा इतर भागावर ताण / दाब पडणे म्हणजेच

छातीकडे असलेले लक्ष कमी होणे होय. म्हणून श्वास सोडतांना तो शरीराच्या कोणत्या भागातून बाहेर पडतो आहे याकडे लक्ष द्या. चूक होत असल्यास ती लगेच सुधारा.

  • छातीवर ताण - दाब द्यायचा आहे. छातीवर मन एकाग्र करायचे आहे.

पार्श्वभागाचे स्नायूंवर ताण / दाब पडणे म्हणजे त्या भागातील स्नायूंवर मन एकाग्र होणे. ज्या ठिकाणी मन एकाग्र होते त्या ठिकाणी शक्ती/उर्जा तयार होते. ही चूक वारंवार होत असल्यास मूळव्याधीचा त्रास होण्याचा संभव असतो.

  • घशातील अन्न नलिकेची झडप उघडून नाकाने श्वास सोडण्यासाठी खालील

कोणतीही एक पध्दत पहिले दोन तीन दिवस वापरा. त्या नंतर आवंढा न गिळता श्वास सोडणे सहज जमते. अ+उ+म) 'म' चा उच्चार करतांना तोंड बंद, ओठ बंद ठेवा. अन्नधनलिकेतून श्वास सोडा. =

  • फुंकणीने अग्नी प्रज्वलित करण्यासाठी हळुवारपणे फुंकर मारायला सुरूवात

करा. सुरूवात झाल्यावर लगेच हळूच ओठ बंद करा. श्वास सोडण्याचे शेवटचे टोक गाठा.

एखादे गुपित दुसऱ्याचे कानात घशातून मोठ्याने सांगा.

  • एक आवंढा गिळून घशातून श्वास सोडा.

वायू ॐ सूचना - श्वास घेण्याची क्रिया (पूरक) वर दिलेल्या सूचनेप्रमाणे करा. मेदवृद्धीतून मुक्ती ९४