पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्वासाची मात्रा इंद्रधनुष्याच्या कमानी सारखी छातीच्या भात्यामध्ये हळूवारपणे चढती ठेवा. (श्वास मध्ये थांबविणे, धक्का देणे टाळा.) आपल्या क्षमतेप्रमाणे श्वास घेतल्यावर तो छातीमध्ये पकडून ठेवा. पार्श्वभाग मोकळा आहे याकडे लक्ष ठेवा. थांबा. श्वास सोडून द्या. आवश्यक असल्यास नाक व तोंड यांचा वापर करा. या संपूर्ण क्रियेला पूरक म्हणतात. श्वास घेतांना छाती फुगते. शरीर आपोआप आतल्या आत थोडे वर उचलले जाते. शरीराचे वजन थोडे पुढे झुकले जाते. प्रत्येक वेळी मान सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. श्वास सोडण्यासाठी (रेचक) करण्यासाठी सूचना - आवंढा गिळा. (थुंकी गिळण्यासारखे करा.) आवाज ऐकत श्वास सोडण्यास सुरूवात करा. श्वास सावकाश सोडा. घाई करू नका. श्वास नाकाने सोडा. तोंड बंद ठेवा. श्वास सोडतांना त्याच्या आवाजाकडे लक्ष द्या. श्वास सोडतांना तो शरीराच्या कोणत्या भागातून मोकळा होतो आहे, याकडे लक्ष द्या. आवाज संपला तरी ओटीपोट आतमध्ये ओढा. तो भाग मोकळा करा. या संपूर्ण क्रियेला रेचक म्हेणतात. पूरक व रेचक या दोन्ही क्रिया एकदा करून बघू. कृतीला सुरूवात करा. सूचना नाहीत. लक्षात ठेवा - -

  • आवंढा गिळतांना श्वास नलिकेची झडप बंद होते. अन्न नलिकेची झडप

उघडते. तोंड बंद ठेवल्यावर श्वास नाकातूनच सोडण्यास सुरूवात होते.

  • सूर्यनमस्कार शिकण्याची सुरूवात दीर्घ श्वसनाच्या अभ्यासाने करावयाची

मेदवृद्धीतून मुक्ती ९३