पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

।। श्रीरामसमर्थ ।। १५. वायू ॐ आणि नाद ॐ दीर्घ श्वसन- प्राणवायू सूर्यनमस्काराचा प्राण आहे. या प्राणतत्त्वाची जागा आहे छाती. छातीची लवचिकता वाढवायची आणि अधिक प्रमाणात प्राणतत्त्व शरीरात घ्यायचे हे सूर्यनमस्काराचे प्रथम उद्दिष्ट. शरीरातील प्रत्येक मांस पेशींचा आवडता व निर्णायक खुराक म्हणजे प्राणतत्त्व. श्वासावाटे हवेच्या माध्यमातून प्राणतत्त्व म्हणजे सूर्यतेजाचा पुरवठा जीवाला गर्भामध्ये सुरू होतो. वायू म्हणजेच मरुत - मारुती, रुद्र, महारुद्र इत्यादी. ही सर्व शक्ती- सामर्थ्य यांची प्रतिके आहेत. वायूची शक्ती अगाध आहे, अफाट आहे, अनंत आहे. ही सर्व विशेषणे मानसिक सामर्थ्य व शारीरिक क्षमता यांचा निर्देश करतात. श्वासाचा (पूरक) सराव करण्यासाठी सूचना- पूर्व दिशेकडे तोंड करून आसनावर बसा. दोन्ही हातांचे मनगट गुढघ्यावर ठेवा. अंगठा - तर्जनीचे टोक एकत्र पकडा. सरळ ताठ बसा. आरामात बसा. शांत संगीताचे हळूवार स्वर असलेली ध्वनीफित (कॅसेट) किंवा मंत्रजपाची ध्वनिफित आवश्य लावा. प्रात्यक्षिक सूचना : श्वसन करतांना संपूर्ण लक्ष श्वसन मार्ग व फुप्फुसे (नाक व छाती) याकडे ठेवा. मान सरळ ठेवा. खोल दीर्घ श्वास आवाज न करता सावकाश घ्या. आपल्या छातीच्या क्षमतेप्रमाणे श्वास दोन, तीन, पाच, सहा किंवा सात टप्यामध्ये भरून घ्या. श्वास घेतांना प्रत्येक टप्पा - ०१, ०२, ०३ - ०४, मनामध्ये मोजा. मेदवृद्धीतून मुक्ती ९२