पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उजव्या हाताच्या बोटांची टोके व आंगठा एकत्र पकडा. या पाच बोटांच्या चिमट्याने डाव्या हाताच्या तळव्यावर ठोकायला सुरूवात करा. ४+४+४+२ अशा चौदा ठोके मोजत, चार टप्यांमध्ये, एक श्वास सोडत हे सर्व ठोके मारायचे आहेत. प्रत्येक टप्प्याला थांबल्या सारखे करायचे आहे पण श्वास घ्यायचा नाही. या अगोदरच्या प्रकारात सांगितल्या प्रमाणे ठोके मोजतांना अंकातील एक स्वर घेवून त्याचा उच्चार करा. श्वास घ्या. सूचना दिल्याप्रमाणे लागोपाठ चौदा ठोके डाव्या तळव्यावर वेगाने जोरात मारा. थांबा. पुन्हा श्वास घेऊन लागोपाठ चौदा ठोक्यांचे एक आवर्तन करा. या प्रमाणे ठोक्यांचे अकरा आवर्तन करा. आता डाव्या हाताने उजव्या हातावर चौदा ठोक्यांचे अकरा आवर्तन करा. तळहातावर एकत्र झालेली ऊर्जा चेहऱ्यावर हात ठेऊन शरीरात पुन्हा संक्रमित करा. लक्षात ठेवा - तळ हातावर सर्व दाबबिंदू आहेत. हे सर्व दाब बिंदू पायांच्या तळव्यावरही आहेत. शरीरातील सर्व अवयवांच्या शीरा हात आणि पायापर्यंत पसरलेल्या आहेत. सूर्यनमस्कारामध्ये ९५% पेक्षा अधिक स्नायूपेशी कार्यरत करावयाच्या आहेत. त्याची ही सुरूवात आहे. आंघोळ झाल्यावर सर्व स्नायूपेशी जाग्या झालेल्या आहेत. त्यांना जोमाने काम करण्यासाठी सूचना दिलेली आहे. टाळी वाजवितांना तयार झालेली कंपने त्या-त्या अवयवांपर्यंत पोहचविण्यासाठी पार्श्वभाग (मल-मूत्र विसर्जनाचे दोन्ही अवयव) ताणरहित ठेवायचे आहेत. त्याची सवय पहिल्या प्रकारापासून करावयाची आहे. छाती, मान, पाठ, खांदे, काख येथील स्नायू मोकळे करायचे आहेत. सर्व शरीरातील मासपेशींना अधिक प्रमाणात प्राणतत्त्वाचा पुरवठा करायचा आहे. या प्राण शक्तीचा वापर करून आपल्याला सूर्यनमस्कार घालायचे आहेत. मेदवृद्धीतून मुक्ती ९१