पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जाणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. ४+४+४+२ अशा चौदा टाळ्या मोजत, चार टप्यामध्ये घेतलेला श्वास सोडत सोडत या सर्व टाळ्या वाजवायच्या आहेत. प्रत्येक टप्याला थांबल्या सारखे करायचे आहे पण श्वास घ्यायचा नाही. टाळ्या मोजतांना अंकातील एक स्वर घेवून त्याचा उच्चार करा. जसे एक- ए-ए-ए-ए + ए-ए-ए-ए + ए-ए-ए-ए + ए - ए. - दोन - ओ-ओ-ओ-ओ + ओ-ओ-ओ-ओ + ओ-ओ-ओ-ओ + ओ- ओ. अकरा रा रा रा रा + रा रा रा रा + रा रा रा रा + रा रा. नमस्कार स्थितीमध्ये हात ठेवा. हातांची बोटे पक्के दाबून धरा. हाताचा तळवा, मनगट एकमेकांपासून दूर करा. अंगठे एकमेकांपासून दूर ठेवा. श्वास घ्या. सूचना दिल्याप्रमाणे लागोपाठ चौदा टाळ्या वेगाने जोरात वाजवा. थांबा. पुन्हा श्वास घेऊन लागोपाठ चौदा टाळ्यांचे एक आवर्तन करा. या प्रमाणे टाळ्यांचे अकरा आवर्तन करा. हाताच्या दोन्ही अंगठ्यांना गालाचा आधार द्या. डोळ्यांच्या पापण्या बंद करा. पापण्या आतून वर उचलून धरा. मधले बोट तीन वेळा पापण्यांवर हळूवारपणे फिरवा. थांबा. या नंतर हाताचा तळवा गालावर ठेवा. बोटे कपाळावर ठेवा. चेहऱ्यावर थोडा दाब दिल्यासारखे करा. डोळे दाबले जाणार नाहीत याकडे लक्ष द्या. तळहातावर एकत्र झालेली ऊर्जा शरीरात पुन्हा संक्रमित करा. प्रकार बदल- तळहातावरील दाबबिंदू कार्यरत करायचे आहेत. डावा हात पूर्णपणे उघडा. मेदवृद्धीतून मुक्ती ९०