पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकार बदल- श्वास घेत दोन्ही हात छातीच्या रेषेत डोक्यावर उंच उचला. छातीजवळ आणून जोरात एक टाळी वाजवा. हात उचलतांना खांदे वर उचलले जातात. दृष्टी हाताच्या बोटांबरोबर वर उचलली जाते. पुन्हा एकदा दोन्ही हात उर्ध्वमंडलात फिरवून नाभी जवळ जोरात टाळी वाजवा. पूर्ण तळव्यांचा आणि संपूर्ण बोटांचा वापर करा. साधारणपणे तीस वेळा जोरात टाळी वाजवा. प्रत्येक वेळी तोंडाने हुंकार, तोंड बंद, मान सरळ ठेवा. हात नमस्कार स्थितीमध्ये. प्रकार बदल श्वास घेत दोन्ही हात खांद्याच्या रेषेत उचलून मागे सरकवा. दोन्ही हात वेगाने जवळ घेऊन जोमदारपणे हुंकार देत एकमेकांवर आपटा. पूर्ण तळव्यांचा आणि संपूर्ण बोटांचा वापर करा. तळव्यावरील झिणझिण्या स्वीकारा. श्वास घेऊन पुढील टाळी वाजवा. वीस टाळ्या झाल्यातनंतर हळूहळू टाळी वाजविण्याचा वेग वाढवा. श्वास, हुंकार व टाळी यांचा ताल बिघडला की वेग कमी करा. साधारणपणे तीस वेळा टाळी वाजवा. हात नमस्कार स्थितीमध्ये. - सूचना - टाळी वाजवितांना पार्श्वभाग ताणरहित आहे याकडे लक्ष द्या. प्रत्येक वेळी तोंडाने हुंकार द्या. तोंड बंद, मान सरळ ठेवा. हातांच्या तळव्यावर जोरदार सुरू झालेली स्पंदने स्वीकारा. प्रकार बदल - सूचना हाताच्या बोटांवरील दाबबिंदू कार्यरत करायचे आहेत. फक्त बोटांचा उपयोग करून जोरदार टाळी वाजवायची आहे. हातांचे तळवे एकमेकांवर आपटले मेदवृद्धीतून मुक्ती ८९