पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नखे घासा. नखाचे खालील बोट घासा. बोटांच्या खाली दोन-तीन इंचाचा भाग घासा. ही क्रिया साधारपणे दोन मिनिटे करा. पाय बदलून हिच क्रिया करा. हातावरील दाबबिंदू नेत्रकाच (कॉन्ट्यॅक्ट लेन्स), श्रवण यंत्र, घड्याळ पायातील मोजे काढून चष्मा, ठेवा. पूर्व दिशेकडे तोंड करून आसनावर आरामात उभे रहा. डोक्यावरुन हात फिरवा. हाताला लागलेले तेल सर्व पंजावर पसरविण्यासाठी हात एकमेकावर घासा. डावा हात स्थिर ठेवा. उजव्या हाताने त्यावर तीन वेळा जोराने टाळी वाजवा. हात नमस्कार स्थितीमध्ये. सूचना- टाळी वाजवितांना पार्श्व भाग ताणरहित राहण्यासाठी प्रत्येक वेळी तोंडाने हुंकार द्या. तोंड बंद ठेवा. आता उजवा हात स्थिर ठेवा. डाव्या हाताने त्यावर तीन वेळा जोराने टाळी वाजवा हात नमस्कार स्थितीमध्ये. शरीरातील सर्व स्नायुपेशी कार्यप्रवृत्त होण्यासाठी दिलेली ही पूर्व सूचना आहे. प्रकार एक हात कोपरातून खाली सोडा. हाताचे पंजे कमरेच्या रेषेत वर उचला. जोरदार टाळी वाजवा. पूर्ण तळव्यांचा आणि संपूर्ण बोटांचा वापर करा. पुन्हा एकदा दोन्ही हात अधोमंडलात फिरवून नाभी जवळ जोरात टाळी वाजवा. साधारणपणे तीस वेळा टाळी वाजवा. प्रत्येक वेळी तोंडाने हुंकार देत टाळी वाजवा. तोंड बंद, मान सरळ ठेवा. हात नमस्कार स्थितीमध्ये. मेदवृद्धीतून मुक्ती ८८