पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रघुवीर समर्थ ।। ॥ श्री रामदास स्वामी संस्थान, सज्जनगड | श्री रामदास स्वामींचा मठ, सज्जनगड, जि. सातारा-४१५०१३ (महाराष्ट्र) दूरध्वनी (०२१६२) २७८२२१, २७८२२२ भ्रमणध्वनी ९४२३०३४९१२ वेबसाईट : www.samartharamdas.com वन्ही तो चेतवादा रे । चेतविताचि चेततो ।। जय जय सर्व रोगांवर उपचार सूर्यनमस्कार. दि. २५ मे २०१५ मेदवृद्धीतून मुक्ती ट्रस्ट रजि. नं. : अ- ११५ / सातारा ।।जय जय रघुवीर समर्थ ॥ 'मेदवृद्धीतून मुक्ती' या ग्रंथाच्या केलेल्या नामकरणावरूनच सध्याच्या धावपळीच्या व दूषित झालेल्या वातावरणाचा अनुभव घेत जगणाऱ्या आपणा सर्वांनाच ग्रंथाचा खुप मोठा आधार वाटतो. सध्याच्या जीवनशैलीत घडत असलेल्या बदलामुळे मानसिक व शारीरिक दोनही स्तरावर खुपच मरगळता व कमकुवतपणा आलेला आपल्याला जाणवतो. तो दूर सारण्याकरिता आपण नेहमी सतर्क असतोच. अनेकविध उपायांनी त्यापासून स्वतःला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करित असतो. त्या सर्व उपायातील सर्वात सिध्द उपाय म्हणजेच सूर्यनमस्कार होय. सूर्यनमस्काराचा पुरस्कार अनेक संतानी व शास्त्रज्ञांनी स्वतः अनुभवसिध्द होऊन केलेला आहे. समर्थांच्या चरित्रात तर सूर्यनमस्काराचे अद्वितीय स्थान आढळते. मन आणि बुध्दीला बल प्रदान करणाऱ्या या सूर्यनमस्काराचे समर्थांनी वेळोवेळी खूपच समर्थन केलेले आढळते. शारीरिक उन्नयनासाठी वेगळा व्यायाम करावा लागतो व मानसिक स्थिरता मिळवण्यासाठी वेगळा व्यायाम करावा लागतो. पण सूर्यनमस्कार सर्व रोगांवर लागू पडणारे एक रामबाण औषधच आहे. अशा या सूर्यनमस्कार साधनेत आपले आयुष्य व्यतीत करून अनेक साधकांना याचा अनुभव घेण्यास प्रवृत्त करणारे समर्थभक्त श्री. सुभाष खर्डेकर यांचा हा कृतीकर्माचा ध्यास अत्यंत स्तुत्य आहे. त्यांनी आपला ग्रंथ सिध्द करताना भावना आणि विचार यांचा सुरेख संगम साधला आहेच, परंतु त्याच्या तळाशी प्रत्येकाला चांगले मानसिक आणि शारीरिक स्वास्थ मिळावे ही त्यांची तळमळ आहे. त्यांच्या या कार्यास समर्थांचे आशिर्वाद व माझ्या शुभेच्छा! श्री. सु. ग. तथा बाळासाहेब स्वामी (चार्टर्ड अकौंटंट) अध्यक्ष व अधिकारी स्वामी श्री रामदास स्वामी संस्थान, सज्जनगड ०८