पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

॥ श्रीराम समर्थ || १. प्रस्तावना शक्तीने मिळती राज्ये। युक्तीने यत्न होतसे । शक्ती युक्ती जये ठाई। तेथे श्रीमंती धावती || - श्री समर्थ रामदास स्वामी - वरील श्लोकामध्ये शक्ती आणि युक्तीचे यथार्थ महत्त्व स्वामींनी वर्णन केले आहे. माझ्या सारख्या शिवसमर्थ भक्ताला राष्ट्रधनामध्ये (तरुणांमध्ये) शक्ती व युक्तीचे संचलन व्हावे हे वाटणे अगदी स्वाभाविक आहे. तीन वर्षापूर्वी रामकृपेने ग्रंथराज दासबोधाचे उपासनेला आरंभ झाला व जीवनदशा व दिशा पालटली. लहानपणापासून व्यायामाची आवड असल्याने सर्व प्रकारच्या व्यायामाचा अनुभव व अनुभूती. कॉलेज जीवनात शरीरसौष्ठव स्पर्धेत भाग घेतला होता. गेली अनेक वर्षे सूर्यनमस्काराचा यथामती अभ्यास व सराव चालू होता. दि. १/५/२०१४ रोजी व्यायाम करीत असताना अंत:प्रेरणा झाली की तरुणांमधल्या बलाचा व सद्गुणांचा जिर्णोद्धार करावा व त्यासाठी सूर्यनमस्कार वर्ग आयोजित करण्याचा मानस तयार झाला. त्याप्रमाणे स. भ. गुरुवर्य मोहनबुवा रामदासी यांची अनुज्ञा घेऊन कार्यास प्रारंभ केला. दि. ३/५/२०१४ रोजी श्री. खर्डेकर काकांच्या सूर्यस्थान संस्थेद्वारे सूर्यनमस्काराच्या प्रचार आणि प्रसाराची माहीती इंटरनेटद्वारे मिळाली. दूरध्वनी वरून संपर्क साधला व मानस प्रतिपादन केला. क्षणाचाही विलंब न करता काकांनी लगेच मान्यता दिली व येण्याचे कबूल केले. समर्थ कार्याला विलंब कैसा. समविचारी मित्र जमली व दि. २४/६/२०१४ ते २८/६/२०१४ दरम्यान प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. सर्वांना साशंकता होती की ५ दिवस सूर्यनमस्कारामध्ये शिकवण्यासारखे काय आहे. पण जेव्हा खर्डेकर काकांचे शिबीर संपन्न झाले तेव्हा कळले की सूर्यनमस्कार नुसता व्यायाम प्रकार नसून एक योग मेदवृद्धीतून मुक्ती ०९