पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आपल्या क्षमतेप्रमाणे आसनातील उच्चतम स्थितीला आल्यानंतर थोडावेळ थांबा.

नंतर ताण / दाब दिलेले स्नायू मोकळे करा. स्नायू कोठून मोकळे होत आहेत याकडे लक्ष द्या.

  • ज्या स्नायूंना ताण / दाब दिलेला आहे तेच स्नायू मोकळे होत आहेत हे पहा.

( इतर स्नायू मोकळे होत असतील तर तुमची ही चूक पुढील आसनामध्ये सुधारा.)

यानंतर पुढील सूर्यमंत्र म्हणून नंतरचे आसन करण्यास सुरूवात करा. इतर दहा सूर्यनमस्कार वेळेचे बंधन न पाळता घाला. प्रत्येक आसनामध्ये पार्श्वभाग मोकळा आहे याकडे लक्ष द्या.

पहिला सूर्यनमस्कार घालण्यासाठी वापरलेली शारीरिक व मानसिक क्षमता शेवटच्या सूर्यनमस्कारापर्यंत टिकवून ठेवा. संपूर्ण लक्ष क्रियेवर ठेवा. सूर्यनमस्कार - प्राणायाम सराव सत्रामध्ये शिकलेले पूरक व्यायाम प्रकार व प्राणायाम यांचा अभ्यास आठवड्यातून किमान एकदा करा.

सूर्यनमस्कार सरावामुळे स्नायूंचे दुखणे उद्भवल्यास एक / दोन दिवस वायू ॐ, नाद ॐ याचा सराव करा. श्वसन सरावाचा अभ्यास व्यवस्थित करा. (सूर्यनमस्कार स्थगित ठेवले तरी चालेल.)

हात व पायावरील दाबबिंदूंना कार्यरत करा. सकाळी ठराविक वेळी टाळ्या वाजवून हातावरील दाबबिंदू (मर्मबिंदू) कार्यरत करा.

समजून-उमजून, जाणिवपूर्वक सूर्यनमस्कार साधनेचे तप करा. जगातील प्रत्येक कुटुंब सूर्यनमस्कार साधनेचे केंद्र व्हावे, कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती सूर्यनमस्कार साधनेचा प्रचार-प्रसार करणारा कार्यकर्ता व्हावा हे आपले उद्दिष्ट आहे, हे लक्षात ठेवा.

  • आपल्या सर्वांना सूर्यनमस्कार साधनेतून उदंड आरोग्य व आनंद प्राप्त व्हावा

ही प्रभुरामचंद्रांचे चरणी प्रार्थना. ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ मेदवृद्धीतून मुक्ती ८५