पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
  • स्नायू व स्नायुपेशींची ताकद त्यांच्या ताण सहन करण्याच्या क्षमतेवर

अवलंबून असते. जास्त प्रमाणात ताण- दाब दिल्यास स्नायू तुटतील / मांसतंतू फाटतील हे पक्के लक्षात ठेवा.

  • स्नायू दुखण्याचे कारण सूर्यनमस्कार असल्यास कोणत्या आसनात चूक

झाली ते शोधा. त्या आसनातील प्राथमिक कौशल्याचा वापर करून ती कृती करा.

  • सूर्यनमस्कार एक साधना कार्यपुस्तिका (साधकांसाठी फक्त) हे पुस्तक

प्रशिक्षण वर्गाचे पाठ्यपुस्तक आहे. त्याचा आधार घ्या. सूर्यनमस्कार साधनेत सातत्य ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होईल.

आहार - शाकाहारी, ताजे, गरम व शिजवलेले अन्न खा. सर्वप्रकारचे विकतचे तयार अन्न पदार्थ वर्ज करा.

शरीराचे वय, वजन लक्षात घ्या. पोट साफ करण्यासाठी प्रत्येक शनिवार व बुधवार संजिवन चूर्ण घ्या.

स्नान झाल्यानंतर दररोज किमान १२+०१ सूर्यनमस्कार घाला.

  • त्यातील तीन समंत्रक सूर्यनमस्कार (अधोरेखित सूर्यमंत्र) प्रत्येकी पाच

मिनिटांमध्ये घाला. (एकूण ०५ x०३ = १५ मिनिटे + दहा सूर्यनमस्कार १० मिनिटे) =

  • मित्रायनम: रवयेनमः सूर्यायनमः । भानवेनमः

खगायनमः पूष्णेनम: हिरण्यगर्भायनमः। मरीचये नमः आदित्यायनमः सवित्रेनमः अर्कायनमः । भास्कराय नमः श्रीसवितासूर्यनारायणायनमोनमः || या मंत्राचा उच्चार करून समर्पण सूर्यनमस्कार (+१) घाला.

  • चवथा, आठवा, बारावा हे तीन सूर्यनमस्कार घालतांना प्रत्येक आसनामध्ये

शरीराच्या विशिष्ट भागावर दिलेला ताण-दाब याचा अनुभव घ्या. शरीराचा इतर भाग ताण-दाब रहित ठेवा. (पार्श्वभाग मोकळा आहे याकडे विशेष लक्ष द्या.)

  • प्रत्येक आसनामधील ऊर्जाचक्राकडे मन एकाग्र करा. श्वासाकडे लक्ष ठेवा.

मेदवृद्धीतून मुक्ती ८४