पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

।। श्रीरामसमर्थ ।। १४. मर्मबिंदू कार्यरत करणे बौद्धिक संपले. सूर्यनमस्कार घालण्यास सुरूवात करतो आहोत. मन एकाग्र करून प्रत्येक कृती करा. इतरांना शिकविण्यासाठी प्रत्येक कृतीचा सराव करा. त्यातील बारकावे लक्षात घ्या. ते कसे स्पष्ट करता येतील याचा विचार करा. स्नान विधी - शरीर संचलन - एक शौच विधी नंतर स्नान करणे अपेक्षित आहे. अंघोळ प्रथम क्रमांकाचे शरीर संचलन (warming up) आहे. हवेतील गारवा आणि गरम पाणी यामुळे शरीरातील प्रत्येक पेशीचे आकुंचन प्रसरण होते. गार गरम शेक प्रत्येक पेशीला मिळतो. अंघोळ करतांना अनेक वेळा हिच क्रिया अनेक वेळा होते. सर्व पेशींना अभ्यंग (मसाज) होते. तसेच गरम पाण्याची लोटी अंगावर घेतली की त्वचेचे तापमान एकदम वाढते. शरीराचे मूळ तापमान पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सर्व पेशी कार्यरत होतात. रक्ताभिसरण व्यवस्थित सुरू होते. अंघोळ झाल्यावर मन उत्साही व प्रसन्न असते, बुद्धी तल्लख - तरल असते, शरीरातील स्नायू - सांधे लवचिक व कार्यप्रवण होतात. हा आपला दररोजचा अनुभव आहे. यासाठी अंघोळीनंतरच सूर्यनमस्कार घालावे. दाबबिंदू सराव (ऍक्युप्रेशर) शरीर संचलन - दोन अॅक्युप्रेशरचे सर्व बिंदू दोन्ही हातांवर आणि पायांवर आहेत. सर्वांना आपण कार्यरत करणार आहोत. अंघोळीच्या वेळेस शक्य होईल त्या दिवशी दोन्ही पायांचे संपूर्ण तळवे दगडाने दोन तीन मिनिटे घासा. पायाची कड घासा. तळवा व तळव्याची कड घासा. पायाची बोटे तसेच अंगठा घासा. चवडा आणि बोटे यामधील भाग घासा. बोटांची टोके घासा. मेदवृद्धीतून मुक्ती ८६