पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

।। श्रीरामसमर्थ ।। १३. सूर्यनमस्कार ब्रह्मकर्मांतर्गत नित्यकर्म स्वयं साधना दैनिक सूर्यनमस्कार सराव सूचना (प्राथमिक) सूर्यनमस्काराची पाच सूत्रे-

स्नायूंची ताकद त्याच्या ताण सहन करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते, त्यांच्या आकार किंवा वजनावर नाही.

ज्या-ज्या ठिकाणी मन एकाग्र होते तेथे ऊर्जा, म्हणजेच शक्ती तयार होते. स्नायू ज्या प्रमाणात श्रम करतात त्या प्रमाणात त्यांना प्राणतत्त्वाचा खुराक आवश्यक आहे.

सूर्यनमस्कारामध्ये ९५% पेक्षा अधिक स्नायू कार्यरत करावयाचे आहेत.

  • सूर्यनमस्काराची संकल्पना दररोजच्या सरावामध्ये अनुभविण्याचा प्रयत्न

करावयाचा आहे.

प्रस्तावने पासून सूर्यनमस्कार तक्ता या शेवटच्या प्रकरणापर्यंत पूर्ण पुस्तकाचे वाचन झाल्यानंतरच सूर्यनमस्कार घालण्यास सुरूवात करा. ही सर्व माहिती मन-बुद्धी यांच्या तयारीसाठी आहे. हे दोघे मिळून तुमच्या शरीराकडून सूर्यनमस्कार घालून घेणार आहेत.

आदर्श सूर्यनमस्कार घालणे हे आपले उद्दिष्ट नाही. त्या-त्या आसनातील स्नायूंना हलका ताण दाब द्या.

शरीरातील कोणत्याही स्नायूंचे दुखणे सुरू न होता सूर्यनमस्कार सराव पूर्ण करणे हे आपले दररोजचे उद्दिष्ट आहे.

आसन स्थिती घेतांना स्नायूंना जोर लावणे, धक्का देणे, अनावश्यक ताण- दाब देणे धोक्याचे आहे हे लक्षात ठेवा.

  • सूर्यनमस्कार घालतांना अधिकाधिक स्नायुपेशींचा सहभाग मिळविणे हा

उद्देश प्रत्येक आसनामध्ये समोर ठेवा.

  • कार्यरत झालेल्या स्नायुपेशिंना अधिकाधिक प्राणतत्त्वाचा पुरवठा करण्याचा

प्रयत्न करा. मेदवृद्धीतून मुक्ती ८३