पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सातत्याने औषधांचा मारा करून शरीराला आळशी, सुस्त, बेसावध ठेऊ नये. शरीर पेशींनी स्वताहून, स्वयंस्पूर्तीने सूर्यनमस्कारात भाग घेऊन साधनेचे सर्व गृहित तत्त्व साध्य करणे हे आपले उद्दिष्ट आहे हे लक्षात ठेवा. मेदवृद्धितून मुक्तता मर्यादा शरीराचे वजन कमी झाले म्हणजे मेदवृद्धी कमी होते असे नाही. शरीराचे वजन कमी असूनही मेदाचे प्रमाण जास्त असू शकते. पण या उलट वजन जास्त म्हणजे मेद, चरबी जास्त हे समीकरण सर्वमान्य आहे. मेदवृद्धीमुळे शरीराला आलेला आकार बदलता येणार नाही. वजन कमी झाल्यामुळे आकारमानात फक्त थोडा बदल होईल. सशाचे रूपांतर मांजरीच्या आकारमानात होणार नाही. घराण्यातील बैठा व्यवसाय व समृद्धी यामुळे वारसा हक्काने मिळालेल्या गोल शरीरात जोम-उत्साह-ताकद ओतणे सूर्यनमस्कार साधनेतून सहज शक्य आहे. पण त्यासाठी साधनेवर संपूर्ण विश्वास व साधनेतील नित्य सातत्य ठेवणे अत्यावश्यक आहे. एका तपाच्या सूर्यनमस्कार साधनेतून अनुवंशिक विकारही दूर ठेवता येतात. उतारवयात हार्मोन / गुणसूत्र यामधील (Hormones Chromosome) कमतरता किंवा त्यांचे संतुलन बिघडते. या विकारामुळे वजन वाढले तर त्याची वाढ साधनेच्या माध्यमातून थोपविता येते. वजन कमी करता येणे कष्टसाध्य आहे. स्त्रियांच्या बाबतील मासिक पाळी बंद झाल्यानंतर वाढलेले वजन कमी करता येत नाही. वाढ मात्र थांबविता येते. मेदवृद्धीचा विकार हा औषधोपचारासाठी असाध्य आहे पण कष्टाने साध्य होणारा आहे असे आयुर्वेद सांगते. शरीराला जादा कष्ट आणि औषधांचा फक्त आधार देणे येवढेच मेदवृद्धी कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. सूर्यनमस्काराची संख्या जशी वाढेल तसा औषधांचा आधारही आपोआप गळून पडेल. ॥ जय जय रघुवीर समर्थ ।। मेदवृद्धीतून मुक्ती ८२