पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

औषधाची मात्रा - रात्री झोपतेवेळी १/२ गोळ्या चावून खाव्यात. वर गरम - दूध घ्याावे. पोट साफ होण्याची तीव्रता लक्षात घेवून औषधाची मात्रा कमी अधिक करावी. साधारणा एक आठवडा औषध घेतल्यावर बंद करावे. पथ्योपचार - सारक असलेले अन्न पदार्थ, फळे घ्यावी. चहा, कॉफी आणि इतर अवरोधक पेयांचे प्रमाण कमी करावे. उपयुक्तता या औषधामुळे कोठा साफ होवून पचनसंस्था सशक्त होते. संपूर्ण आरोग्य सुधारते. हे घरगुती औषध करण्यास सोपे, स्वस्त व अत्यंत परिणामकारक असे आहे. बाजारातील कोणत्याही रेचक प्रकारातील औषधांपेक्षा श्रेष्ठ आहे. याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. सवय लागत नाही. मर्यादा- मधुमेह विकार असल्यास या औषधाचा वापर करू नका. वजन कमी करणे- अर्धा किंवा एक चमचा त्रिफळा तेवढेच मध. एकत्र करा. चाटण रात्री जेवण झाल्यानंतर घ्या. - मी वैद्यक शास्त्राशी संबंधित नाही. वैद्यक शास्त्राचा विद्यार्थीही नाही. औषध- आरोग्य - आनंद या विषयाची काही पुस्तके चाळली, आजिबाईच्या बटव्यात डोकावलो आणि मला भावलेल्या उपयुक्त स्वस्त, मस्त, परिणामकारक औषधांचा उल्लेख केला. पचन संस्थेच्या अवयवांना आपले निहित कार्य करण्यासाठी मदत करणारे अनेक औषधोपचार आहेत. पचेल असा योग्य आहार व सूर्यनमस्कार ही अपचन विकार प्रतिबंधक उपाय योजना झाली. योग्य आहाराला पुरक असलेल्या उपयुक्त सवयी व योग्य पेयपान हा प्राथमिक उपचार झाला. पचन संस्थेस औषधांचा आधार हा प्रगत उपचार आहे. यामध्ये दिलेली औषधे सर्वच अपचनाचे विकारावर शतप्रतिशत लागू पडतील असे नाही. या औषधांचा अपेक्षित परिणाम साध्य होत नसल्यास वैद्याकडून / डॉक्टरांकडून संपूर्ण चिकित्सा करून औषधोपचार नक्की करावेत. पचन संस्थेचे कार्य व्यवस्थित सुरू झाले की औषध घेणे बंद करावे. शरीराबाहेर असणारे औषधी पदार्थ शरीरात जाऊन अवयवांची कार्यक्षमता वाढवितात. सूर्यनमस्कार साधनेत मात्र श्वासामधून घेतलेल्या प्राणशक्तीचा, वैश्विक शक्तीचा प्रभाव वाढवून संपूर्ण शरीरातील सर्व मांसपेशींची कार्यपद्धती व कार्यशक्ती वाढविली जाते. यासाठी शरीराला औषधाची सवय लावू नये. फक्त आधार द्यावा. मेदवृद्धीतून मुक्ती ८१