पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करणे आवश्यक आहे. तो मनापासून आचरणात आणणे गरजेचे आहे. या पाचांची मूठ करून ज्या ज्या वेळी रोग-व्याधी विकार-व्यसन डोके वर काढतील त्या त्या वेळी त्यांच्यावर वज्रप्रहार करायचा. त्यांना नेस्तनाबूत करायचे. संपूर्ण आरोग्याचा आनंद उपभोगायचा. सूर्यनमस्कार साधनेची सर्व गृहित तत्त्वे स्वतःच्या शरीरावर सिद्ध करायची. अवर्णनीय ब्रह्मानंद लुटायचा आणि तो इतरांना वाटायचा. || आनंदाचे ढोही आनंद तरंग।। याचा अनुभव घ्यायचा. पचन संस्थेस पेयपानाचा आधार - लिंबूपान - चैतन्यपूर्ण जीवन जगण्यासाठी मानवाला निसर्गाने दिलेले वरदान म्हणजे 'लिंबू'. सहज उपलब्ध होणारे, स्वस्थ, बहुगुणी, त्वरित परिणाम करणारे 'लिंबू’ सर्वांच्या परिचयाचे आहे. याच्या सेवनाने शरीरातील वात-पित्त- कफ संतुलित राहतात. शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होऊन रक्त शुद्ध होते. आरोग्य संवर्धन होते. यामध्ये अ-ब - क जीवनसत्वाचे प्रमाण १:२:३ असे आहे. तसेच विविध प्रकारचे क्षार - कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, सोडियम, मॅग्नेशियम, ताम्र, फॉस्फरस, क्लोरिन इत्यादी - भरपूर प्रमाणात मिळतात. आनंद उत्साहाचा अनुभव दररोज मिळतो. - पेयपान पद्धत - एक ग्लास पाण्यात अर्धा पिवळसर लिंबू पिळून टाका. त्यात सैंधव व पादेलोण टाका. सकाळ संध्याकाळ लिंबाचे सेवन करावे. उपाशी पोटी घेतल्यास आंतर अवयव, आतडे साफ करण्यास मदत होते. मेदवृद्धी थोपविण्या- साठी गरम पाणी-लिंबू-मध जेवण झाल्यानंतर घ्यावे. उन्हाळ्यात लिंबाचे प्रमाण ४ ते १० पर्यंत वाढविले तरी चालेल. पावसाळ्यात गरम पाण्यात लिंबाचा वापर निश्चित करा. कफकारक प्रकृतीसाठी उपयुक्त आहे. हिवाळ्यात गरम पाणी-लिंबू घेण्याचे प्रमाण कमी करा. काळजी घ्या - लिंबाची बी पोटात जाणार नाही याची काळजी घ्या. जेवणात लिंबाचा वापर करणे टाळा. गरम उष्ण- पदार्थांबरोबर लिंबाचे सेवन करू नका. लिंबाला पर्याय टमाटा. यामध्ये असलेले विविध क्षार व जीवनसत्वे लिंबाशी स्पर्धा करणारे आहेत. ताक पृथ्वीवरील अमृत ताज्या दह्याचे गोडसर- आंबट ताक सैंधव, पादेलाण घालून सकाळच्या जेवणात घ्यावे. पित्तप्रकृतीसाठी ताकाला आलं, मेदवृद्धीतून मुक्ती - ७८