पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सैंधव, पादेलाण, कोथंबीर, जीरे, मिठ, साखर वापरून फोडणी द्यावी किंवा ताकाची कढी करावी. गरम पाणी घेण्याची सवय - रात्री झोपतांना व सकाळी उठल्यावर गरम पाणी घेण्याची सवय पचनशक्ती वाढविण्यासाठी पोषक आहे. पचन संस्थेस औषधांचा आधार संजिवन चूर्ण साहित्य - बाळ हिरडे शंभर ग्राम, एरंडेल तेल वीस / पंचवीस ग्रॅम, सैंधव व पादेलोण चवीपुरते घ्या. औषध करण्याची कृती - बाळहिरडे एरंडेलच्या तेलात परतून घ्या. ते टरारून फुगतात. हलके होतात. गार झाल्यावर शिल्लक एरंडेल तेलासहित, बाळहिरडे मिक्सरमध्ये बारीक करा. त्यात सैंधव व पादेलोण टाका. औषधाची मात्रा - हे संजिवन चूर्ण अर्धा चमचा रात्री जेवण झाल्यावर घ्या. जिभेने उचलत, चव घेत, सावकाश घ्या. याची चव तुरट- खारट - आंबट लागते. त्यानंतर एक छोटा ग्लास गरम पाणी प्या. चूर्ण घेतांना मधून पाणी घेतले तरी चालेल. पथ्योपचार- सारक असलेले अन्न पदार्थ, फळे घ्यावी. चहा, कॉफी आणि इतर अवरोधक पेयांचे प्रमाण कमी करावे. - उपयुक्तता - हे चूर्ण शरीरातील वात-पित्त-कफ संतुलीत ठेवण्यास मदत करते. रात्री उलटीतून पित्त बाहेर पडण्याची शक्यता असते. कोणत्याही वयोगटातील व्यक्तिंना हे रेचक उपयोगी आहे. आठवड्यातून एकदा घ्या किंवा दररोज घ्या याचा त्रास होणार नाही. सवय लागणार नाही. हे सौम्य रेचक आहे तसेच आतड्यांसाठी शक्तीवर्धक चूर्ण आहे. सूर्यनमस्कार सुरू केल्यानंतर प्रत्येक शनिवारी व बुधवारी असे तेरा आठवडे हे चूर्ण घ्यावे. नंतर आवश्यकता लागणार नाही. श्रीसूर्यस्थान समर्थ विद्यारोग्य केंद्र, नासिक येथे संजिवन चूर्ण (रेचक) वापरले जाते. सूर्यनमस्कार प्रशिक्षण वर्ग दर शनिवारी सायंकाळी सुरू होतो. त्या दिवशी जेवण झाल्यावर रात्री हे चूर्ण घेण्यास सांगितले जाते. प्राणायाम, सूर्यनमस्कार करतांना स्नायूंवर ताण - दाब दिला जातो. त्यामुळे पोट साफ नसल्यास शरीरातील वात प्रवाही होऊन कोठेही धक्का देते. स्नायू दुखणे चमक मेदवृद्धीतून मुक्ती ७९