पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कमी झालेली आहे. शरीरातील ताकद आतून वाढावयास हवी." शरीराची ताकद आतून वाढविण्यासाठी व ती कायमस्वरुपी स्थिर राहण्यासाठी प्रथम प्राधान्य बलोपासनेला, सूर्यनमस्काराला. प्राणतत्त्व (प्राणवायू) सूर्यनमस्काराचा प्राण आहे. एकाशिवाय दुसरा अपूर्ण आहे. ही शक्ती- सामर्थ्याची जोडगोळी आहे. शीव-शक्तीची जोडी आहे. नुसता प्राणायामाचा अभ्यास किंवा फक्त सूर्यनमस्काराची साधना शरीरतील मांसपेशींना अपेक्षित सावधानता प्रदान करणार नाही. प्राणायाम केल्याने शरीरातील प्रत्येक मांसपेशी प्राणचैतन्याने प्रभावित होते आणि सूर्यनमस्कारातून शक्ती-चैतन्याचा स्वीकार करण्यासाठी त्यांची क्षमता वाढते. शरीर निर्बल असणे, विकारी असणे म्हणजे प्रत्येक मांसपेशी मलूल, निस्तेज, सुस्त असणे. हा आळशीपणा किंवा नाकर्तेपणा जरुरीपेक्षा जास्त आहार घेणे किंवा उपासमार होणे किंवा अयोग्य आहार घेणे यामुळे होतो. शरीरात घेतलेल्या पौष्टिक अन्नरसातील उर्जेचा वापर कमी आणि साठा अधिक अशी परिस्थिती होते. दुसरा प्रकार आहे निकृष्ट आहारामुळे होणारी मांसपेशींची उपासमार. तिसरा प्रकार आहे अयोग्य आहार, विरूद्ध आहार. यामुळे मांसपेशी बलहीन होतात. आहाराची कमतरता भरून काढली. पण जठराग्नी प्रज्वलित नसेल तर अन्न पचन होणार नाही. मांसपेशींना शक्ती मिळणार नाही. श्वास अपरा होणे म्हणजे अग्नीमांद्य. पचन संस्थेचेवर आतंकवादाचे संकट. ते दूर करण्यासाठी अन्नाचे पचन होणे आवश्यक आहे. पूर्ण श्वास घेण्यासाठी मांसपेशींची शक्ती वाढविण्यासाठी पचन संस्थेला योग्य औषधांचा आधार आवश्यक आहे. शरीरातील वायूतत्त्व (मरूततत्त्व, प्राणतत्त्व, वैश्विकशक्ती, प्राणवायू) कमी होण्याची कारणे आहेत वात-कफ-पित्त. हे तिनही दोष सम स्थितीमध्ये आणण्यासाठी औषध-आहार यांची मदत घेणे म्हणजे औषधोपचार करणे होय. सूर्यनमस्कार साधनेची गृहित तत्त्वे स्वयं सिद्ध आहेत. त्याबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. पण प्राणतत्त्व आणि सूर्यनमस्कार यांचे अद्वैत प्रत्यक्षात आणता आले नाही तर साधना अपूर्ण राहते. तसेच औषधोपचार चालू आहेत, पण आहाराकडे लक्ष नाही. असे असेल तर आजार कमी होणार नाही उलट वाढेल. सूर्यनमस्कार- प्राणतत्त्व, औषधोपचार-आहार ही चौकडी सांभाळण्याचा संकल्प मेदवृद्धीतून मुक्ती ७७