पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तेल-तूप, दुधाचे पदार्थ कमी करा. सूर्यनमस्काराची संख्या वाढवा. शक्य असेल तेंव्हा तिळाच्या तेलाने अभ्यंग करा. (तेलाची मॉलिश करून आंघोळ करा.) काल घेतलेला आहार योग्य होता किंवा नाही याची सूचना सकाळी पोट साफ होतांना आपल्याला दररोज मिळत असते. सूचनांचे पालन करा. त्याप्रमाणे आहारात बदल करा, . सवयी बदला. आपण घेत असलेल्या अन्नाचा चांगला - वाईट परिणाम पुढील पिढ्यांवरही होत असतो हे लक्षात ठेवा. 'हितभूक मितभूक' राहण्याची पोटाला सवय लावा. पचनाला जड असलेले पदार्थ अंगी लागण्यासाठी, त्यांचे संपूर्ण पचन होण्यासाठी सूर्यनमस्काराची संख्या वाढवा. (आहाराबद्दल सविस्तर सूचनांसाठी सूर्यनमस्कार एक साधना कार्यपुस्तिका (साधकांसाठी फक्त) या पुस्तकाचा संदर्भ घ्या.) - पिंडी ते ब्रह्मांडी असे आपण म्हणतो. ||यदिहास्ति तदन्यत्र यन्त्रेचहास्ति न तत्पूर्चित।। संपूर्ण विश्वामध्ये जे जे काय आहे ते ते सर्व आपल्या शरीरात आहे. जे येथे नाही ते कोठेही सापडणार नाही. या न्यायाने बघितले तर सर्व रोगांचे जीव- जंतू - जिवाणू शरीरामध्ये आहेतच. या शरीररूपी राज्याची संरक्षण यंत्रणा सुसज्ज नसेल तर कोणत्याही बेसावध क्षणी शत्रू जिवाणू आक्रमण करून राज्य खालसा करतील. हे आत्मारामाचे राज्यात सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक उपाय योजना, साधना आहेत. त्या सर्व शरीराचे आरोग्य व सूक्ष्म प्राणाचे चैतन्य अबाधित ठेवण्यासाठी शरीर-मन-बुद्धीला सावधपण प्रदान करतात. हा सावधपणा म्हणजे शरीराच्या सर्व संस्था-सांधे-मांसपेशी यांचा चैतन्य - आधार आहे. निसर्गताच हा आधार आपल्याला मिळालेला आहे. तो शेवटच्या श्वायसापर्यंत बलवंत राहावा यासाठी पुन्हा सावधपणाने केलेला साधनेचा अभ्यासच उपयोगी पडतो. सावधपणे साधनेकडे लक्ष दिले नाही, तर शरीरातील प्राण चैतन्य वयोमानपरत्वे क्षीण होत जाते. आपला उत्साह - जोम - ताकद कमी होते. म्हातारपण लवकर येते. रोग विकार वाढतात. आजारपण औषधोपचाराला दाद देत नाही. डॉक्टर सांगतात "औषधांचा स्वीकार करण्याची शरीराची क्षमता मेदवृद्धीतून मुक्ती ७६