पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सायंकाळचे खाणे सूर्यास्तापूर्वी ही आदर्श वेळ. रात्री झोपण्यापूर्वी किमान दोन तास अगोदर सायंकाळचे जेवण घ्या. खाणे झाल्यानंतर साधारण एक तासाने पाणी किंवा दूध घेणे आणि त्यानंतर एक तासाने झोपणे हे अपेक्षित आहे. जेवणाचे अगोदर एक तास पाणी प्यावे शरीराची ऊर्जाभट्टी स्वच्छ साफ करावी. जेवण झाल्यानंतर साधारणपणे एक तासाने पाणी घ्यावे. तयार झालेला अन्नरस अधिक प्रवाही करून पचन संस्थेला सहाय्य करावे. शाकाहारी, गरम, शिजवलेले ताजे अन्न ही चार सूत्रे जेवण करतांना संभाळा. खाण्यासाठी पुढे आलेला पदार्थ या प्रकारात बसणारा नसेल तर तो भूकेल्या पोटी खाऊ नका. तो जेवणात माफक प्रमाणाचा घ्या. ताजे अन्न थंड झाल्यावर त्यातील पोषक तत्त्व ५०% ने कमी होतात. सावकाश अन्नाची चव घेत, संथ गतीने, प्रसन्न चित्ताने जेवण करावे. पचन क्रियेला येथूनच सुरूवात होत असते. जेवणानंतर अर्ध्या तासापर्यंत मुखशुद्धी घेणे किंवा पान खाणे चांगले. त्यानंतर किमान तीन तास खाणे बंद ठेवावे. पोटात गेलेले अन्न साधारण ३.५ तासांनी पुढील आतड्यात प्रगत पचन प्रक्रियेसाठी रवाना होते. त्या अगोदर पोटावर कामाचा बोजा टाकू नये. जेवतांना जास्त पाणी घेऊ नका. मिक्सरमध्ये शेंगदाण्याची चटणी करायची आहे. खूप पाणी घातले तर शेंगदाणे त्यामध्ये फक्त फिरतील. बारिक होणार नाहीत. अन्नाचे अन्नरसात रुपांतर करायचे आहे. अन्नाला गरगर फिरवून पुढील आतड्यात ढकलायचे नाही. तंबाखु, गुटका, मावा, मसाला सुपारी वर्ज करा. कोणत्याही सवयीचा अतिरेक घातक असतो. पचनाचे प्राथमिक रसायन तोंडात तयार होणारी लाळ आहे. ती तयार करण्याचा काळ - वेळ - प्रमाण निसर्गाने निश्चित केलेला आहे. वारंवार थुंकून तिचा स्त्रोत कमी करणे म्हणजे पचनाच्या विकारांना निमंत्रण देण्यासारखे आहे. लाळेमध्ये असलेली पाचकशक्ती कमी करण्यासारखे आहे. जेवणानंतर आईस्क्रीम, थंड पदार्थ घेऊ नका. या उलट जेवणानंतर गरम पाणी प्या. गरम पाण्याने अन्नाचे पचन होण्यास चांगली मदत होते. शरीरातील ऊर्जा-उष्णता पचनासाठी अन्नभट्टीकडे खेचली जाते. गरम पाणी घेतल्याने पचन ऊर्जेमध्ये भर पडते. मेदवृद्धीतून मुक्ती ७५